S M L

शिवसेनाप्रमुख राजवर बरसले

19 जानेवारीमला गुजरातचा गर्व नाही मात्र महाराष्ट्राचा अभिमान आहे. हे राज्य कसंही असलं तरी ते माझं आहे. काही लोक माझी नक्कल करतात तो भाग वेगळा, शेवटी अस्सल ते अस्सल असतं आणि लोकांना ते बरोबर कळतं या शब्दात बाळासाहेबांनी राज ठाकरेंना ठाकरी टोला हाणला. राज ठाकरेंनी उमेदवारांची परीक्षा घेण्याच्या निर्णयावरही बाळासाहेब ठाकरे चांगलेच बरसले. तर काँग्रेसला मत देणे म्हणजे एका प्रकारचा भ्रष्टाचारच आहे असंही बाळासाहेबांनी म्हटलं आहे. आज रंगशारदा सभागृहात शिवसैनिकांसाठी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बाळासाहेब बोलत होते. मात्र कार्यक्रमात प्रसारमाध्यमांच्या कॅमेर्‍यांना बंदी घालण्यात आली यामुळे शिवसेनेनं एकाप्रकारे माध्यमांची नाराजी ओढावून घेतली. महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आणि सर्वच पक्षांनी सत्ताकाबीज करण्यासाठी कंबर कसली. काँग्रेस राष्ट्रवादीने मुंबईत आघाडी करत शिवसेनेची 17 वर्षाची सत्ता उलटून लावण्याची एकमुखाने शपथ घेतली. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवारांच्या परीक्षा घेत निवडणुकांच्या रणधुमाळीचा बार अगोदरच उडवून दिला. आपली 17 वर्षाची सत्ता कायम ठेवण्यासाठी शिवसेनेनं योजना आखत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोबत घेत युतीतून महायुतीची भिंत उभारली. आज शिवसेनेच्या प्रचारासाठी 5 गाण्याच्या सीडीच्या प्रकाशनाच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांनी सेनेच्या प्रचाराला शुभारंभ केला. दसरामेळाव्यानंतर बाळासाहेब आज शिवसैनिकांच्या भेटीला आले. यावेळी बाळासाहेबांनी आपल्या ठाकरी शैलीत चौफेर तोफ डागली. यात पहिला समाचार घेतला तो राज ठाकरे यांचा. मी माझ्या वडिलांसारखाच बोलतो पण मी त्यांची कधी नक्कल केली नाही. काही लोक माझी नक्कल करतात तो भाग वेगळा, शेवटी अस्सल ते अस्सल असतं आणि लोकांना ते बरोबर कळतं. तसेच काही लोकांनी परीक्षा घेतल्या त्यात म्हणे मुंबईतल्या खड्‌ड्यांची लांबी-रूंदी मोजली अशा टोलाही राज यांना लगावला. त्याच बरोबर मला गुजरातचा गर्व नाही मात्र महाराष्ट्राचा अभिमान आहे. हे राज्य कसंही असलं तरी ते माझं आहे या शब्दात बाळासाहेबांनी राज यांना ठाकरी टोला हाणला. यावेळी शिवसैनिकांना बाळासाहेबांनी मोलाचे मार्गदर्शन केलं तसेच, शपथ घ्या की मुंबईतली सत्ता कोणत्याही परिस्थित हातची जाऊ द्यायची नाही. काँग्रेसला मत देणं म्हणजेच एका प्रकारचा भ्रष्टाचार आहे असंही बाळासाहेबांनी म्हटलं. बाळासाहेबांच्या या टीकामुळे येणार्‍या प्रचारात पुन्हा एकदा ठाकरे विरुध्द ठाकरे सामना रंगणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 19, 2012 04:26 PM IST

शिवसेनाप्रमुख राजवर बरसले

19 जानेवारी

मला गुजरातचा गर्व नाही मात्र महाराष्ट्राचा अभिमान आहे. हे राज्य कसंही असलं तरी ते माझं आहे. काही लोक माझी नक्कल करतात तो भाग वेगळा, शेवटी अस्सल ते अस्सल असतं आणि लोकांना ते बरोबर कळतं या शब्दात बाळासाहेबांनी राज ठाकरेंना ठाकरी टोला हाणला. राज ठाकरेंनी उमेदवारांची परीक्षा घेण्याच्या निर्णयावरही बाळासाहेब ठाकरे चांगलेच बरसले. तर काँग्रेसला मत देणे म्हणजे एका प्रकारचा भ्रष्टाचारच आहे असंही बाळासाहेबांनी म्हटलं आहे. आज रंगशारदा सभागृहात शिवसैनिकांसाठी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बाळासाहेब बोलत होते. मात्र कार्यक्रमात प्रसारमाध्यमांच्या कॅमेर्‍यांना बंदी घालण्यात आली यामुळे शिवसेनेनं एकाप्रकारे माध्यमांची नाराजी ओढावून घेतली.

महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आणि सर्वच पक्षांनी सत्ताकाबीज करण्यासाठी कंबर कसली. काँग्रेस राष्ट्रवादीने मुंबईत आघाडी करत शिवसेनेची 17 वर्षाची सत्ता उलटून लावण्याची एकमुखाने शपथ घेतली. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवारांच्या परीक्षा घेत निवडणुकांच्या रणधुमाळीचा बार अगोदरच उडवून दिला. आपली 17 वर्षाची सत्ता कायम ठेवण्यासाठी शिवसेनेनं योजना आखत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोबत घेत युतीतून महायुतीची भिंत उभारली. आज शिवसेनेच्या प्रचारासाठी 5 गाण्याच्या सीडीच्या प्रकाशनाच्या निमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांनी सेनेच्या प्रचाराला शुभारंभ केला.

दसरामेळाव्यानंतर बाळासाहेब आज शिवसैनिकांच्या भेटीला आले. यावेळी बाळासाहेबांनी आपल्या ठाकरी शैलीत चौफेर तोफ डागली. यात पहिला समाचार घेतला तो राज ठाकरे यांचा. मी माझ्या वडिलांसारखाच बोलतो पण मी त्यांची कधी नक्कल केली नाही. काही लोक माझी नक्कल करतात तो भाग वेगळा, शेवटी अस्सल ते अस्सल असतं आणि लोकांना ते बरोबर कळतं. तसेच काही लोकांनी परीक्षा घेतल्या त्यात म्हणे मुंबईतल्या खड्‌ड्यांची लांबी-रूंदी मोजली अशा टोलाही राज यांना लगावला.

त्याच बरोबर मला गुजरातचा गर्व नाही मात्र महाराष्ट्राचा अभिमान आहे. हे राज्य कसंही असलं तरी ते माझं आहे या शब्दात बाळासाहेबांनी राज यांना ठाकरी टोला हाणला. यावेळी शिवसैनिकांना बाळासाहेबांनी मोलाचे मार्गदर्शन केलं तसेच, शपथ घ्या की मुंबईतली सत्ता कोणत्याही परिस्थित हातची जाऊ द्यायची नाही. काँग्रेसला मत देणं म्हणजेच एका प्रकारचा भ्रष्टाचार आहे असंही बाळासाहेबांनी म्हटलं. बाळासाहेबांच्या या टीकामुळे येणार्‍या प्रचारात पुन्हा एकदा ठाकरे विरुध्द ठाकरे सामना रंगणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2012 04:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close