S M L

राहुल गांधींना दाखवले काळे झेंडे

21 जानेवारीउत्तर प्रदेशातल्या प्रचारसभेत काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्यात आले. आदिवासीबहुल दुध्दीमध्ये त्यांची प्रचारसभा होती. राहुल गांधी भाषणासाठी उभे राहीले तेच दोन तरुणांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी हजर असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होतं या दोन तरुणांना मारहाण केली. यापैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याचं नाव अजयकुमार सिंह असं आहे. राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्याची गेल्या काही दिवसांतली ही दुसरी घटना आहे. विशेष म्हणजे आज राहुल यांच्या प्रचार दौर्‍याचा शेवटचा दिवस होता. तरुणांनी दाखवलेल्या झेंड्यावर काळा पैसा परत आणा असा मजकूर होता. काही कळण्याअगोदरच प्रसारमाध्यमांच्या कॅमेरात कैद झाला. आणि कार्यक्रमस्थळी उपस्थित काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दोन तरुणांना बेदम मारहाण केली यातून एक तरुण निसटला पण अजयकुमार सिंह नावाचा तरुण पोलिसांच्या तावडीत सापडला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 21, 2012 04:09 PM IST

राहुल गांधींना दाखवले काळे झेंडे

21 जानेवारी

उत्तर प्रदेशातल्या प्रचारसभेत काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्यात आले. आदिवासीबहुल दुध्दीमध्ये त्यांची प्रचारसभा होती. राहुल गांधी भाषणासाठी उभे राहीले तेच दोन तरुणांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी हजर असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होतं या दोन तरुणांना मारहाण केली. यापैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याचं नाव अजयकुमार सिंह असं आहे. राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्याची गेल्या काही दिवसांतली ही दुसरी घटना आहे. विशेष म्हणजे आज राहुल यांच्या प्रचार दौर्‍याचा शेवटचा दिवस होता. तरुणांनी दाखवलेल्या झेंड्यावर काळा पैसा परत आणा असा मजकूर होता. काही कळण्याअगोदरच प्रसारमाध्यमांच्या कॅमेरात कैद झाला. आणि कार्यक्रमस्थळी उपस्थित काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दोन तरुणांना बेदम मारहाण केली यातून एक तरुण निसटला पण अजयकुमार सिंह नावाचा तरुण पोलिसांच्या तावडीत सापडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2012 04:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close