S M L

पुष्पसेन सावंत यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

22 जानेवारीसिंधुदुर्गमधील नारायण राणे यांचे विरोधक पुष्पसेन सावंत यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला. नारायण राणेंना थेट विरोध करण्यासाठीच काँग्रेसने आपला वापर करून घेतला असा आरोप त्यांनी प्रदेश काँग्रेसवर केला. आज झालेल्या कार्यक्रमात सावंत यांनी शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश केला.या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड उपस्थिती होते. सावंत राष्ट्रवादीत दाखल झाल्याने जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राणे विरुध्द सावंत हा सामना चांगलाच रंगणार असं मानलं जातंय. या निवडणुकीत सावंत यांच्या कार्यकर्त्यांना तिकीट देण्याचे राष्ट्रवादीकडून कबूल करण्यात आल्याचं समजतं. राष्ट्रवादी सिंधुदुर्गात स्वबळावर निवडणूक लढवत असल्यामुळे सावंत यांचा राष्ट्रवादीला फायदा होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 22, 2012 05:15 PM IST

पुष्पसेन सावंत यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

22 जानेवारी

सिंधुदुर्गमधील नारायण राणे यांचे विरोधक पुष्पसेन सावंत यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकला. नारायण राणेंना थेट विरोध करण्यासाठीच काँग्रेसने आपला वापर करून घेतला असा आरोप त्यांनी प्रदेश काँग्रेसवर केला. आज झालेल्या कार्यक्रमात सावंत यांनी शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश केला.या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड उपस्थिती होते. सावंत राष्ट्रवादीत दाखल झाल्याने जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राणे विरुध्द सावंत हा सामना चांगलाच रंगणार असं मानलं जातंय. या निवडणुकीत सावंत यांच्या कार्यकर्त्यांना तिकीट देण्याचे राष्ट्रवादीकडून कबूल करण्यात आल्याचं समजतं. राष्ट्रवादी सिंधुदुर्गात स्वबळावर निवडणूक लढवत असल्यामुळे सावंत यांचा राष्ट्रवादीला फायदा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 22, 2012 05:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close