S M L

नाट्यसंमेलनात बेळगावच्या महापौरांवर कारवाईच्या निषेधार्थ ठराव

22 जानेवारीसांगलीतल्या 92 व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचा आज समारोप झाला. नाट्यसंमेलनात आज दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. बेळगावातल्या महापौरांविरोधात जो राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. त्याचा निषेध करणारा ठराव आज मांडण्यात आला. तर नाट्यसंमेलनाच्या आजी-माजी अध्यक्षांची प्रकट मुलाखतीही घेण्यात आल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार या समारोप समारंभाला येणार होते पण आचारसंहिता असल्याने ते या सोहळ्यात सहभागी होऊ शकले नाहीत. नाट्‌यसंमेलनाचे उद्घाटक अमोल पालेकर यांचं भाषण गाजलं ते त्यांनी नाट्य परिषदेवर केलेल्या टीकेमुळे... नाट्य परिषद नाटक वाढवण्याचा प्रयत्नच करत नाही, असा थेट हल्ला पालेकरांनी केला. समांतर रंगभूमीलाही नाट्य परिषदेनं साधं व्यासपीठही उपलब्ध करून दिलं नाही असंही पालेकर म्हणाले. सत्यदेव दुबेंसारख्या रंगकर्मीला नाट्यपरिषद विसरली याबद्दल खंतही त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 22, 2012 04:02 PM IST

नाट्यसंमेलनात बेळगावच्या महापौरांवर कारवाईच्या निषेधार्थ ठराव

22 जानेवारी

सांगलीतल्या 92 व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचा आज समारोप झाला. नाट्यसंमेलनात आज दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. बेळगावातल्या महापौरांविरोधात जो राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. त्याचा निषेध करणारा ठराव आज मांडण्यात आला. तर नाट्यसंमेलनाच्या आजी-माजी अध्यक्षांची प्रकट मुलाखतीही घेण्यात आल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार या समारोप समारंभाला येणार होते पण आचारसंहिता असल्याने ते या सोहळ्यात सहभागी होऊ शकले नाहीत. नाट्‌यसंमेलनाचे उद्घाटक अमोल पालेकर यांचं भाषण गाजलं ते त्यांनी नाट्य परिषदेवर केलेल्या टीकेमुळे... नाट्य परिषद नाटक वाढवण्याचा प्रयत्नच करत नाही, असा थेट हल्ला पालेकरांनी केला. समांतर रंगभूमीलाही नाट्य परिषदेनं साधं व्यासपीठही उपलब्ध करून दिलं नाही असंही पालेकर म्हणाले. सत्यदेव दुबेंसारख्या रंगकर्मीला नाट्यपरिषद विसरली याबद्दल खंतही त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 22, 2012 04:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close