S M L

औरंगाबादमध्ये राष्ट्रगीत समूह गायनाचा विश्वविक्रम

माधव सावरगावे, औरंगाबाद25 जानेवारी50, 000 मुलांनी औरंगाबादमध्ये आज जन गण मन या राष्ट्रगीताचं समूहगायन करत नवा विश्वविक्रम नोंदवला. वर्ल्ड रेकॉर्डचे 'गिनीज'चे कडक नियम पाळत गारखेडाच्या विभागीय क्रीडा संकुलात विश्‍वकवी टागोरांच्या लेखणीतून उतरलेल्या राष्ट्रगीताचा समूहगीत गायनाचा हा विश्वविक्रम नोंदवण्यात आला. लोकमत समूहाने या अभिमास्पद कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. औरंगाबादमधील गारखेडाच्या क्रीडा संकुलात जमलेले 50, 000 विद्यार्थी.... तेवढेच उत्साही प्रेक्षक आणि मान्यवरांची स्टेजवर उपस्थिती..या सगळ्यांच्या साक्षीने जन गण मन या राष्ट्रगीताचे समूहगानाचा विश्वविक्रम नोंदवला गेला.दैनिक लोकमत वृत्तसमूहाने या अभिमानास्पद कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी सकाळपासूनच गारखेडाच्या या मैदानावर लाखो नागरिकांनी गर्दी केली होती. राष्ट्रगीताचे बोल सुरू होताच एका सुरात आणि एका तालात विद्यार्थ्यांनी विश्वकवी टागोरांच्या लेखणीतून उतरलेल्या या महन्‌मंगल गीताचं उच्चारण केलं आणि एकच स्फूर्तीची लहर पसरली. याआधीचा समूहगीत गायनाचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. औरंगाबादच्या या कार्यक्रमात आता ही विक्रम भारताच्या नावावर झाला आहे. तोही विद्यार्थ्यांच्या दणदणीत उपस्थितीने. गिनीज बुक प्रतिनिधींने स्टेजवरच त्याचंी घोषणा केली. आयबीएन-लोकमतनेही या ऐतिहासिक गौरवास्पद समूहगायनाचं थेट प्रक्षेपण करून देशभरातील नागरिकांना त्याची अनूभुती दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 25, 2012 09:43 AM IST

औरंगाबादमध्ये राष्ट्रगीत समूह गायनाचा विश्वविक्रम

माधव सावरगावे, औरंगाबाद25 जानेवारी

50, 000 मुलांनी औरंगाबादमध्ये आज जन गण मन या राष्ट्रगीताचं समूहगायन करत नवा विश्वविक्रम नोंदवला. वर्ल्ड रेकॉर्डचे 'गिनीज'चे कडक नियम पाळत गारखेडाच्या विभागीय क्रीडा संकुलात विश्‍वकवी टागोरांच्या लेखणीतून उतरलेल्या राष्ट्रगीताचा समूहगीत गायनाचा हा विश्वविक्रम नोंदवण्यात आला. लोकमत समूहाने या अभिमास्पद कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

औरंगाबादमधील गारखेडाच्या क्रीडा संकुलात जमलेले 50, 000 विद्यार्थी.... तेवढेच उत्साही प्रेक्षक आणि मान्यवरांची स्टेजवर उपस्थिती..या सगळ्यांच्या साक्षीने जन गण मन या राष्ट्रगीताचे समूहगानाचा विश्वविक्रम नोंदवला गेला.

दैनिक लोकमत वृत्तसमूहाने या अभिमानास्पद कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी सकाळपासूनच गारखेडाच्या या मैदानावर लाखो नागरिकांनी गर्दी केली होती. राष्ट्रगीताचे बोल सुरू होताच एका सुरात आणि एका तालात विद्यार्थ्यांनी विश्वकवी टागोरांच्या लेखणीतून उतरलेल्या या महन्‌मंगल गीताचं उच्चारण केलं आणि एकच स्फूर्तीची लहर पसरली. याआधीचा समूहगीत गायनाचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता. औरंगाबादच्या या कार्यक्रमात आता ही विक्रम भारताच्या नावावर झाला आहे. तोही विद्यार्थ्यांच्या दणदणीत उपस्थितीने. गिनीज बुक प्रतिनिधींने स्टेजवरच त्याचंी घोषणा केली. आयबीएन-लोकमतनेही या ऐतिहासिक गौरवास्पद समूहगायनाचं थेट प्रक्षेपण करून देशभरातील नागरिकांना त्याची अनूभुती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 25, 2012 09:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close