S M L

राजपथावर भारतीय सामर्थ्याचं दर्शन

26 जानेवारीआज देशभरात 63 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होतोय. दिल्लीत आज ध्वजारोहण करण्यात आलंय. यावेळी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी थायलंडच्या पहिल्या महिला पंतप्रधान यिंगलिक शिनावात्रा या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तत्पूर्वी पंतप्रधानांनी सुरूवातीला अमर जवान ज्योती इथं शहिदांना आदरांजली वाहिली. त्यानंतर शहिद जवानांना सैन्यातर्फे मानवंदना देण्यात आली. ध्वजारोहणानंतर शौर्य पुरस्कारांचंही वितरण करण्यात आलं. मराठा लाईट इन्फंट्रीचे लेफ्टनंट नवदीप सिंग यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आलं. काश्मीरमध्यल्या एलओसीवर पाकिस्तानी घुसखोरी रोखताना त्यांना 20 ऑगस्टला मरण आलं होतं. त्यांचे वडील सुभेदार जोगिंदर सिंग यांनी हे अशोक चक्र स्वीकारलं. यानंतर या कार्यक्रमात वेगवेगळ्या राज्यांची संस्कृती आणि कला दाखवणारे चित्ररथ आले. तर त्यानंतर वेगवेगळे नृत्यप्रकार, मोटरसायकलवरच्या थरारक कसरती आणि हवाई कवायती सादर झाल्या.तसेच ध्वजारोहणानंतर तिन्ही सैन्यदलांनी राजपथावर देशाच्या संरक्षण शक्तीचं प्रदर्शन केलंय. यावेळी सार्‍या देशाला लष्करी शक्तीचे दर्शन घडलं. यात देशातल्या तिन्ही सैन्य दलांतल्या वेगवेगळ्या रेजिमेंट्स, रणगाडे आणि क्षेपणास्त्रं होती. त्याचबरोबर सैन्याच्या मानवंदनेनंतर राज्यांच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारे चित्ररथ राजपथावर दाखल झाले. यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाचे वैशिष्ट्य म्हणजे 2011-2012 हे वर्ष पर्यटन वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यातले पर्यटनस्थळ महाराष्ट्राच्या चित्ररथावर दिसले. अजिंठ्‌याचं कैलास मंदिराचा देखावा यावेळी सादर करण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 26, 2012 08:57 AM IST

राजपथावर भारतीय सामर्थ्याचं दर्शन

26 जानेवारी

आज देशभरात 63 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होतोय. दिल्लीत आज ध्वजारोहण करण्यात आलंय. यावेळी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी थायलंडच्या पहिल्या महिला पंतप्रधान यिंगलिक शिनावात्रा या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तत्पूर्वी पंतप्रधानांनी सुरूवातीला अमर जवान ज्योती इथं शहिदांना आदरांजली वाहिली. त्यानंतर शहिद जवानांना सैन्यातर्फे मानवंदना देण्यात आली. ध्वजारोहणानंतर शौर्य पुरस्कारांचंही वितरण करण्यात आलं.

मराठा लाईट इन्फंट्रीचे लेफ्टनंट नवदीप सिंग यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आलं. काश्मीरमध्यल्या एलओसीवर पाकिस्तानी घुसखोरी रोखताना त्यांना 20 ऑगस्टला मरण आलं होतं. त्यांचे वडील सुभेदार जोगिंदर सिंग यांनी हे अशोक चक्र स्वीकारलं. यानंतर या कार्यक्रमात वेगवेगळ्या राज्यांची संस्कृती आणि कला दाखवणारे चित्ररथ आले. तर त्यानंतर वेगवेगळे नृत्यप्रकार, मोटरसायकलवरच्या थरारक कसरती आणि हवाई कवायती सादर झाल्या.

तसेच ध्वजारोहणानंतर तिन्ही सैन्यदलांनी राजपथावर देशाच्या संरक्षण शक्तीचं प्रदर्शन केलंय. यावेळी सार्‍या देशाला लष्करी शक्तीचे दर्शन घडलं. यात देशातल्या तिन्ही सैन्य दलांतल्या वेगवेगळ्या रेजिमेंट्स, रणगाडे आणि क्षेपणास्त्रं होती. त्याचबरोबर सैन्याच्या मानवंदनेनंतर राज्यांच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारे चित्ररथ राजपथावर दाखल झाले. यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाचे वैशिष्ट्य म्हणजे 2011-2012 हे वर्ष पर्यटन वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यातले पर्यटनस्थळ महाराष्ट्राच्या चित्ररथावर दिसले. अजिंठ्‌याचं कैलास मंदिराचा देखावा यावेळी सादर करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 26, 2012 08:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close