S M L

महात्मा गांधींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

30 जानेवारीफक्त भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला आपल्या अहिंसा, क्षमा, शांती, दया या तत्वांचा संदेश देणारे महात्मा गांधी यांचा आज स्मृतीदिन.. 30 जानेवारी 1948 ला नथुराम गोडसेनं त्यांची गोळया घालून हत्या केली. आयुष्यभर शांतीचा संदेश देणार्‍या गांधीजींचे शेवटचे शब्दही होते हे राम... गांधीजी आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्या विचारांनी ते आजही आपल्यातच आहेत...बापूंना आदरांजली वाहण्यासाठी आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधींच्या स्मृतीदिनानिमित्त गांधीजींच्या आश्रमात आज एका प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं. दुसरीकडे गांधीजींच्या समाधीस्थळी राजघाटला जाऊन राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक नेत्यांनी या महात्म्याच्या स्मृतीला अभिवादन केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 30, 2012 11:06 AM IST

महात्मा गांधींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

30 जानेवारी

फक्त भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला आपल्या अहिंसा, क्षमा, शांती, दया या तत्वांचा संदेश देणारे महात्मा गांधी यांचा आज स्मृतीदिन.. 30 जानेवारी 1948 ला नथुराम गोडसेनं त्यांची गोळया घालून हत्या केली. आयुष्यभर शांतीचा संदेश देणार्‍या गांधीजींचे शेवटचे शब्दही होते हे राम... गांधीजी आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्या विचारांनी ते आजही आपल्यातच आहेत...बापूंना आदरांजली वाहण्यासाठी आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा गांधींच्या स्मृतीदिनानिमित्त गांधीजींच्या आश्रमात आज एका प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं. दुसरीकडे गांधीजींच्या समाधीस्थळी राजघाटला जाऊन राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान मनमोहन सिंग, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक नेत्यांनी या महात्म्याच्या स्मृतीला अभिवादन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 30, 2012 11:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close