S M L

'जश्न ए आजादी'ला अभाविपच्या विरोधामुळे स्क्रीनिंग खोळंबले

30 जानेवारीजयपूरमधील साहित्य महोत्सवात मुस्लीम कट्टरपंथीयांच्या दबावामुळे सलमान रश्दींच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रद्द करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच पुण्यातही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा प्रकार घडला. संजय काक यांच्या जश्न ए आजादी या डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंगला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्षेप घेतला. त्यामुळे सिंबायोसिस संस्थेनं सपशेल माघार घेतली आहे. ही डॉक्युमेंटरी दाखवली जाऊ नये यासाठी सिंबायोसिस संस्थेला पुणे पोलिसांनी एक पत्र लिहीले आहे. सिंबायोसिस आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेजने 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान व्हॉईसेस ऑफ काश्मीर या चर्चासत्राचे आयोजन केलं होतं. याच कार्यक्रमात संजय काक यांची जश्न ए आजादी ही डॉक्युमेंटरी दाखवली जाणार होती. पण यात भारतीय सैन्याचे एकांगी चित्र रंगवण्यात आल्याचा आक्षेप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घेतला. त्याचबरोबर इतरही काही स्वयंसेवी संस्थांनी चर्चासत्रातील इतरही कार्यक्रमांना आक्षेप घेतला आहे. त्यामुळे संघटनांचे आक्षेप आणि पोलीस उपायुक्त मकरंद रानडे यांनी पाठवलेलं पत्र यामुळे संस्थेनं हा कार्यक्रमच स्थगित केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 30, 2012 10:32 AM IST

'जश्न ए आजादी'ला अभाविपच्या विरोधामुळे स्क्रीनिंग खोळंबले

30 जानेवारी

जयपूरमधील साहित्य महोत्सवात मुस्लीम कट्टरपंथीयांच्या दबावामुळे सलमान रश्दींच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रद्द करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच पुण्यातही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा प्रकार घडला. संजय काक यांच्या जश्न ए आजादी या डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंगला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्षेप घेतला. त्यामुळे सिंबायोसिस संस्थेनं सपशेल माघार घेतली आहे. ही डॉक्युमेंटरी दाखवली जाऊ नये यासाठी सिंबायोसिस संस्थेला पुणे पोलिसांनी एक पत्र लिहीले आहे. सिंबायोसिस आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेजने 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान व्हॉईसेस ऑफ काश्मीर या चर्चासत्राचे आयोजन केलं होतं. याच कार्यक्रमात संजय काक यांची जश्न ए आजादी ही डॉक्युमेंटरी दाखवली जाणार होती. पण यात भारतीय सैन्याचे एकांगी चित्र रंगवण्यात आल्याचा आक्षेप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घेतला. त्याचबरोबर इतरही काही स्वयंसेवी संस्थांनी चर्चासत्रातील इतरही कार्यक्रमांना आक्षेप घेतला आहे. त्यामुळे संघटनांचे आक्षेप आणि पोलीस उपायुक्त मकरंद रानडे यांनी पाठवलेलं पत्र यामुळे संस्थेनं हा कार्यक्रमच स्थगित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 30, 2012 10:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close