S M L

कट्टरपंथीयांच्या विरोधामुळे नसरीन यांचेही पुस्तक प्रकाशन रद्द

01 फेब्रुवारीवादग्रस्त लेखक सलमान रश्दींनंतर वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांनाही कट्टरपंथियांच्या विरोधाचा फटका बसला आहे. तस्लिमा नसरीन यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन रद्द करावं लागलं आहे. कोलकत्यात सुरू असलेल्या पुस्तक मेळ्यात तस्लिमा नसरीन यांच्या निर्वासितांच्या समस्यांवर आधारित 'निर्बसन' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार होतं. पण काही कट्टरपंथीयांनी या पुस्तक प्रकाशनाला विरोध केला. पोलिसांकडून माहिती मिळताच खबरदारी म्हणून शेवटच्या क्षणी आयोजकांनी पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम रद्द केला. याविरोधात प्रकाशकांनी स्टॉलवरच या पुस्तकाचं प्रकाशन केलं. याआधीही तस्लिमा नसरीन यांच्या लज्जा या पुस्तकावरुन बराच वाद झाला होता. यावर तस्लिमा नसरीन यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली'कोलकाता बुक फेअर समितीनं माझ्या पुस्तक प्रकाशनाचा आज होणारा कार्यक्रम रद्द केला. का? कारण काही जातीयवादी घटकांना ते नको होतं.'

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 1, 2012 05:45 PM IST

कट्टरपंथीयांच्या विरोधामुळे नसरीन यांचेही पुस्तक प्रकाशन रद्द

01 फेब्रुवारी

वादग्रस्त लेखक सलमान रश्दींनंतर वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन यांनाही कट्टरपंथियांच्या विरोधाचा फटका बसला आहे. तस्लिमा नसरीन यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन रद्द करावं लागलं आहे. कोलकत्यात सुरू असलेल्या पुस्तक मेळ्यात तस्लिमा नसरीन यांच्या निर्वासितांच्या समस्यांवर आधारित 'निर्बसन' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार होतं. पण काही कट्टरपंथीयांनी या पुस्तक प्रकाशनाला विरोध केला. पोलिसांकडून माहिती मिळताच खबरदारी म्हणून शेवटच्या क्षणी आयोजकांनी पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम रद्द केला. याविरोधात प्रकाशकांनी स्टॉलवरच या पुस्तकाचं प्रकाशन केलं. याआधीही तस्लिमा नसरीन यांच्या लज्जा या पुस्तकावरुन बराच वाद झाला होता.

यावर तस्लिमा नसरीन यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली

'कोलकाता बुक फेअर समितीनं माझ्या पुस्तक प्रकाशनाचा आज होणारा कार्यक्रम रद्द केला. का? कारण काही जातीयवादी घटकांना ते नको होतं.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 1, 2012 05:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close