S M L

टीव्हीवरील रिअ‍ॅलिटीचं युद्ध वाढलंय

21 नोव्हेंबर, मुंबई मनाली पवारटेलिव्हिजनवर रिअ‍ॅलिटीचं शोचं प्रस्थ सध्या एंटरटेनमेन्ट इंडस्ट्रीत वाढत चाललंय. इतकं की आता प्रेक्षक मालिकांपेक्षाही हे शोज जास्त पसंत करतात. यामुळेच अनेक मोठ्या पडद्यावरचे चर्चित चेहरेही आता या शोजकडे एक चांगली संधी म्हणून पाहतात. त्यांना तर हा करिअरमधील ब्रेक वाटतोय. ' कार्यक्रमानं मला ओळख मिळाली. रिअ‍ॅलिटी शोजमुळे फेम मिळतं. पब्लिसिटी मिळते ', असं अभिनेत्री राखी सावंत सांगते. इंडियन आयडॉलमध्ये सहभागी झालेला गायक राहुल वैद्य म्हणाला की चॅनलमध्ये कॅट फाईट सुरू आहे. याआधीचे रियालीटी शो असे नव्हते. पण मलाही असं वाटतं की, आत्ताचे रिअ‍ॅलिटी शोजं हे टी.आर पीसाठीच असतात.गाण्याच्या तसंच डान्सच्या रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांना पसंती आहेच पण आता सळसळत्या तरुणाईला आव्हान देणारे अ‍ॅक्शनवर आधारित रिअ‍ॅलिटी शोजही चांगला टीआरपी खेचताना दिसत आहेत. पण अनेकदा या शोजवर स्क्रीप्टेड म्हणजेच सगळं ठरवून केल्याचा आरोपही केला जातो. ' काही शोजं स्क्रिप्टेड असतात, असं मलाही वाटतं आणि ते चॅनलच्या टी.आर.पीसाठी असतात 'असं रोडीज्‌चे परीक्षक रघू सांगत होते.शोज स्क्रिप्टेड असोत वा नसोत पण त्यातून त्या शो ची जास्तीत जास्त पब्लिसिटी होणं, हा एक उद्देश असतो. जितकी जास्त पब्लिसिटी तितके त्या शोचे भाग जास्त, असं गणित चॅनल्सनाही मंजूर असतंच. टेलिव्हिजनला लोकप्रिय होण्याचं हे गणित चांगलंच जमलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 21, 2008 04:48 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 21, 2008 04:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close