S M L

नाशिकमध्ये भुजबळांचा प्रा.लि.कारभार - राज

12 फेब्रुवारीनाशिकमध्ये एका अधिकार्‍याला जाळण्यापर्यंत मजल गेली, रस्त्यावर महिलांना सुरुक्षा नाही नुसता गुन्हेगारांनी हैदोस घातला आहे पण गुन्हेगारांना माज हा छगन भुजबळ यांच्यामुळे आला आहे. हेच गुन्हेगारांना पोसतात आणि निवडणुकीत पण उतरवतात असा घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी भुजबळ यांच्यावर केला. नाशकाचा सगळा भुजबळ प्रा.लिमीटेड कंपनी कारभार करुन टाकला आहे. तेलगी प्रकरणात यांच्या पोराला अटक होणार होती पण रातोरात सगळ्यांना परदेशी पाठवून दिले. तसेच सभा पाहता यावी नाही म्हणून केबल बंद करुन टाकली आहे असा भेकड प्रयत्न भुजबळ यांनी केला आहे असा आरोपही राज यांनी केला. राज ठाकरे यांची आज नाशिकमध्ये भव्य सभा पार पडली. ठाणे,पुणे पाठोपाठ राज ठाकरे यांचा झंझावती दौरा आज नाशिकमध्ये धडकला. यावेळी राज यांनी छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीवर तोफ डागली. गेल्या 10 वर्षापासून यांच्याकडे राज्याचा कारभार आहे पण तरी सुध्दा यांना महापालिकेची सत्ता पाहिजे आहे जर त्यांनी मनात आणलं असतं तर या शहरांचा विकास झाला असता पण टक्क्याचे गणित कोण करणार यामुळे यांच्याकडून काही होऊ शकत नाही. आणि हे होऊ शकत नाही कारण त्यांनी जनतेला गृहीत धरत . प्रत्येक वेळा तीच आश्वासन देता आणि तेच करुन दाखवतात असा आरोप राज यांनी केला. तसेच नाशकाचा सगळा कारभार हा छगन भुजबळ यांनी प्रा.लि. करुन टाकला आहे. यांच्या पोराला,पुतण्याला कसं मोठ करता येईल याकडे यांचा कल आहे. तिकडे तेलगी प्रकरणात समीर भुजबळला अटक होणार होती तेव्हा रातोरात सगळ्यांना परदेशात पाठवून दिले. माझ्यावर ही खूनाचा आरोप केला होता पण कुठे हे ? यांची अंडीपिल्ली बाहेर काढायला मला वेळ लागणार नाही असा इशाराही राज यांनी दिला. शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला भुजबळच जबाबदार आहे आणि त्यासोबत राष्ट्रवादी. सगळे गुंड यांच्या राष्ट्रवादीत भरली आहे. यांच्यामुळे या गुंडगिरीला माज चढला आहे. रस्त्यांवर महिलांना सुरुक्षा नाही. यांच्यावर वचक आणण्यासाठी खमक्या अधिकारीही या लोकांना आणता येत नाही. याच्या मागेही यांच्या गुंडांच्या तडीपारी रद्द करणासाठी पोलीस अधिकारी आणत नाही असा आरोप राज यांनी केला. त्याचबरोबर शहरात कोठेही सभा पाहता यावी नाही म्हणून भुजबळांनी केबल बंद करुन टाकली आहे. आणि हे आताचे नाहीतर अनेक वृत्तवाहिन्यांवर जेव्हा यांच्या आणि यांच्या पुत्राच्या विरोधात बातम्या लावल्या जातात तेव्हा ही भेकड लोकं केबल बंद करतात असा आरोपही राज यांनी केला. तसेच राज यांनी पुन्हा एकदा गुजरातच्या विकासाची स्तुती केली. मी राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण बघत नाही मला शहरांचा विकास करायाचा ही शहर माझी आहेत यासाठी एकहाती सत्ता द्यावी असं आवाहनही राज यांनी नाशिककरांना केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 12, 2012 03:40 PM IST

नाशिकमध्ये भुजबळांचा प्रा.लि.कारभार - राज

12 फेब्रुवारी

नाशिकमध्ये एका अधिकार्‍याला जाळण्यापर्यंत मजल गेली, रस्त्यावर महिलांना सुरुक्षा नाही नुसता गुन्हेगारांनी हैदोस घातला आहे पण गुन्हेगारांना माज हा छगन भुजबळ यांच्यामुळे आला आहे. हेच गुन्हेगारांना पोसतात आणि निवडणुकीत पण उतरवतात असा घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी भुजबळ यांच्यावर केला. नाशकाचा सगळा भुजबळ प्रा.लिमीटेड कंपनी कारभार करुन टाकला आहे. तेलगी प्रकरणात यांच्या पोराला अटक होणार होती पण रातोरात सगळ्यांना परदेशी पाठवून दिले. तसेच सभा पाहता यावी नाही म्हणून केबल बंद करुन टाकली आहे असा भेकड प्रयत्न भुजबळ यांनी केला आहे असा आरोपही राज यांनी केला. राज ठाकरे यांची आज नाशिकमध्ये भव्य सभा पार पडली.

ठाणे,पुणे पाठोपाठ राज ठाकरे यांचा झंझावती दौरा आज नाशिकमध्ये धडकला. यावेळी राज यांनी छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीवर तोफ डागली. गेल्या 10 वर्षापासून यांच्याकडे राज्याचा कारभार आहे पण तरी सुध्दा यांना महापालिकेची सत्ता पाहिजे आहे जर त्यांनी मनात आणलं असतं तर या शहरांचा विकास झाला असता पण टक्क्याचे गणित कोण करणार यामुळे यांच्याकडून काही होऊ शकत नाही. आणि हे होऊ शकत नाही कारण त्यांनी जनतेला गृहीत धरत . प्रत्येक वेळा तीच आश्वासन देता आणि तेच करुन दाखवतात असा आरोप राज यांनी केला. तसेच नाशकाचा सगळा कारभार हा छगन भुजबळ यांनी प्रा.लि. करुन टाकला आहे. यांच्या पोराला,पुतण्याला कसं मोठ करता येईल याकडे यांचा कल आहे. तिकडे तेलगी प्रकरणात समीर भुजबळला अटक होणार होती तेव्हा रातोरात सगळ्यांना परदेशात पाठवून दिले. माझ्यावर ही खूनाचा आरोप केला होता पण कुठे हे ? यांची अंडीपिल्ली बाहेर काढायला मला वेळ लागणार नाही असा इशाराही राज यांनी दिला.

शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीला भुजबळच जबाबदार आहे आणि त्यासोबत राष्ट्रवादी. सगळे गुंड यांच्या राष्ट्रवादीत भरली आहे. यांच्यामुळे या गुंडगिरीला माज चढला आहे. रस्त्यांवर महिलांना सुरुक्षा नाही. यांच्यावर वचक आणण्यासाठी खमक्या अधिकारीही या लोकांना आणता येत नाही. याच्या मागेही यांच्या गुंडांच्या तडीपारी रद्द करणासाठी पोलीस अधिकारी आणत नाही असा आरोप राज यांनी केला. त्याचबरोबर शहरात कोठेही सभा पाहता यावी नाही म्हणून भुजबळांनी केबल बंद करुन टाकली आहे. आणि हे आताचे नाहीतर अनेक वृत्तवाहिन्यांवर जेव्हा यांच्या आणि यांच्या पुत्राच्या विरोधात बातम्या लावल्या जातात तेव्हा ही भेकड लोकं केबल बंद करतात असा आरोपही राज यांनी केला. तसेच राज यांनी पुन्हा एकदा गुजरातच्या विकासाची स्तुती केली. मी राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण बघत नाही मला शहरांचा विकास करायाचा ही शहर माझी आहेत यासाठी एकहाती सत्ता द्यावी असं आवाहनही राज यांनी नाशिककरांना केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 12, 2012 03:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close