S M L

कृपाशंकर सिंह यांच्या चौकशीत राजकीय ढवळाढवळ - तावडे

23 फेब्रुवारीकृपाशंकर सिंह यांच्या चौकशीत राजकीय ढवळाढवळ करण्यात आली आहे. सिंह यांची अँटी करप्शनच्या चौकशीदरम्यान शरद पवार आणि आर.आर.पाटील यांची भेट झाली होती. या भेटीनंतर सिंह यांच्यावरील कारवाई सौम्य झाली होती त्यांना आघाडीने मिळून अभय दिला होता.असा गौप्यस्फोट विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी केला. विनोद तावडे यांनी आजच्या सवाल या कार्यक्रमात हा गंभीर आरोप केला. मधु कोडा प्रकरणात अडकलेल्या कृपाशंकर सिंह यांना महापालिकेच्या निवडणुकांआधीच मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद सोडायला सांगितलं जाईल असं अनेक काँग्रेस नेत्यांना वाटत होतं. पण कृपाशंकर सिंह यांचं दिल्लीतलं प्रस्थ मोठं असल्यानं त्यांच्यावर काँग्रेस श्रेष्ठींची कृपा झाली. त्यांना मुंबई काँग्रेसचे काळजीवाहू अध्यक्षपद देण्यात आलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने कृपाशंकर सिंह यांनी राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय कसा बरोबर आहे, हे पक्षश्रेष्ठींनाही पटवून दिलं. मात्र यात काँग्रेस कार्यकर्त्यांना कृपाशंकर सिंह यांची काही वेगळीच चाल दिसली.कृपाशंकर सिंह यांच्याविरोधातील बेहिशोबी संपत्तीचे प्रकरण हायकोर्टात गेलं. त्याचा निकाल हा कधी ना कधी त्यांच्याविरोधात लागणारच होता. पण त्याआधीच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन कृपाशंकर सिंह यांनी अहवालाबरोबरच आपला राजीनामा हायकमांडकडे पाठवला होता. एकीकडे कृपाशंकर सिंह यांचा राजीनामा काँग्रेस हायकमांडने स्वीकारला. तर दुसरीकडे मुंबई हायकोर्टाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. आज आमच्या आजच्या सवाल या कार्यक्रमात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी कृपांवर आघाडीची कृपा होती असा गौप्यस्फोट केला. अँटी करप्शनच्या चौकशीदरम्यान शरद पवार आणि आर.आर.पाटील यांची भेट झाली होती. या भेटीनंतर सिंह यांच्यावरील कारवाई सौम्य झाली होती त्यांना आघाडीने मिळून अभय दिला होता.असा गौप्यस्फोट विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी केला. एवढी संपत्ती आली कुठून?सामाजिक कार्यकर्ते संजय तिवारी यांनी कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी कृपाशंकर सिंह यांच्या बेनामी संपत्तीची माहिती दिली. तिवारी यांच्या म्हणण्यानुसार कृपाशंकर यांच्याकडे काय काय बेनामी संपत्ती आहे ?विलेपार्ले : ज्युपिटर बिल्डिंगमध्ये 1355 स्क्वे.फू. आणि 550 स्क्वे.फू. असे दोन फ्लॅट्स- कार्टर रोड, वांद्रे : 4660 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा 'तरंग' बंगला- माऊंट मेरी रोड, वांद्रे : आलिशान फ्लॅट- टर्नर रोड, वांद्रे : 'अफेअर' या आलिशान बिल्डिंगमध्ये 2000 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा फ्लॅट- वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स : एचडीआयएल (HDIL)च्या कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये 22500 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचं ऑफिस- वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स : ट्रेड लिंक, वाधवा बिल्डिंगमध्ये 12000 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचं ऑफिस- भांडुप पश्चिम : एचडीआयएल बिल्डिंगमध्ये दुकानं- सांताक्रूझमध्ये 8650 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा भूखंड- हिरानंदानी गार्डन्स, पवई : 700 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा फ्लॅट (मुख्यमंत्री कोटा)- हिरानंदानी गार्डन्स, पवई : 'गॅलेरिया' या आलिशान कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये दोन व्यापारी गाळे- रत्नागिरी : 250 एकर भूखंड- जौनपूर, उत्तर प्रदेश : 8000 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा व्यापारी गाळा - पनवेल : 1100 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचं दुकान

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2012 06:11 PM IST

कृपाशंकर सिंह यांच्या चौकशीत राजकीय ढवळाढवळ  - तावडे

23 फेब्रुवारी

कृपाशंकर सिंह यांच्या चौकशीत राजकीय ढवळाढवळ करण्यात आली आहे. सिंह यांची अँटी करप्शनच्या चौकशीदरम्यान शरद पवार आणि आर.आर.पाटील यांची भेट झाली होती. या भेटीनंतर सिंह यांच्यावरील कारवाई सौम्य झाली होती त्यांना आघाडीने मिळून अभय दिला होता.असा गौप्यस्फोट विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी केला. विनोद तावडे यांनी आजच्या सवाल या कार्यक्रमात हा गंभीर आरोप केला. मधु कोडा प्रकरणात अडकलेल्या कृपाशंकर सिंह यांना महापालिकेच्या निवडणुकांआधीच मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद सोडायला सांगितलं जाईल असं अनेक काँग्रेस नेत्यांना वाटत होतं. पण कृपाशंकर सिंह यांचं दिल्लीतलं प्रस्थ मोठं असल्यानं त्यांच्यावर काँग्रेस श्रेष्ठींची कृपा झाली. त्यांना मुंबई काँग्रेसचे काळजीवाहू अध्यक्षपद देण्यात आलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने कृपाशंकर सिंह यांनी राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय कसा बरोबर आहे, हे पक्षश्रेष्ठींनाही पटवून दिलं. मात्र यात काँग्रेस कार्यकर्त्यांना कृपाशंकर सिंह यांची काही वेगळीच चाल दिसली.

कृपाशंकर सिंह यांच्याविरोधातील बेहिशोबी संपत्तीचे प्रकरण हायकोर्टात गेलं. त्याचा निकाल हा कधी ना कधी त्यांच्याविरोधात लागणारच होता. पण त्याआधीच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन कृपाशंकर सिंह यांनी अहवालाबरोबरच आपला राजीनामा हायकमांडकडे पाठवला होता. एकीकडे कृपाशंकर सिंह यांचा राजीनामा काँग्रेस हायकमांडने स्वीकारला. तर दुसरीकडे मुंबई हायकोर्टाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. आज आमच्या आजच्या सवाल या कार्यक्रमात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी कृपांवर आघाडीची कृपा होती असा गौप्यस्फोट केला. अँटी करप्शनच्या चौकशीदरम्यान शरद पवार आणि आर.आर.पाटील यांची भेट झाली होती. या भेटीनंतर सिंह यांच्यावरील कारवाई सौम्य झाली होती त्यांना आघाडीने मिळून अभय दिला होता.असा गौप्यस्फोट विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी केला.

एवढी संपत्ती आली कुठून?

सामाजिक कार्यकर्ते संजय तिवारी यांनी कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी कृपाशंकर सिंह यांच्या बेनामी संपत्तीची माहिती दिली. तिवारी यांच्या म्हणण्यानुसार कृपाशंकर यांच्याकडे काय काय बेनामी संपत्ती आहे ?विलेपार्ले : ज्युपिटर बिल्डिंगमध्ये 1355 स्क्वे.फू. आणि 550 स्क्वे.फू. असे दोन फ्लॅट्स- कार्टर रोड, वांद्रे : 4660 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा 'तरंग' बंगला- माऊंट मेरी रोड, वांद्रे : आलिशान फ्लॅट- टर्नर रोड, वांद्रे : 'अफेअर' या आलिशान बिल्डिंगमध्ये 2000 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा फ्लॅट- वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स : एचडीआयएल (HDIL)च्या कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये 22500 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचं ऑफिस- वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स : ट्रेड लिंक, वाधवा बिल्डिंगमध्ये 12000 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचं ऑफिस- भांडुप पश्चिम : एचडीआयएल बिल्डिंगमध्ये दुकानं- सांताक्रूझमध्ये 8650 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा भूखंड- हिरानंदानी गार्डन्स, पवई : 700 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा फ्लॅट (मुख्यमंत्री कोटा)- हिरानंदानी गार्डन्स, पवई : 'गॅलेरिया' या आलिशान कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये दोन व्यापारी गाळे- रत्नागिरी : 250 एकर भूखंड- जौनपूर, उत्तर प्रदेश : 8000 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचा व्यापारी गाळा - पनवेल : 1100 स्क्वे.फू. क्षेत्रफळाचं दुकान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2012 06:11 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close