S M L

मध्यावधी निवडणुकांची कुजबूज

10 मार्चआता देशात मध्यावधी निवडणुकांची कुजबूज सुरू झाली. तिसर्‍या आघीडीचे म्हणून ओळखल्या जाणार्‍या नेत्यांनी ममता बॅनजीर्ंना आपल्या गोटात घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पंजाब आणि उत्तर प्रदेशातल्या शपथविधीसाठी शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांनी ममता बॅनजीर्ंना निमंत्रण दिलंय. पण या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याबद्दल ममता बॅनजीर्ंनी अजून आश्वासन दिलेलं नाही. काँग्रेस मात्र या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. यूपीएच्या अनेक धोरणांना तृणमूल काँग्रेसने अलीकडे जोरदार विरोध केला. त्यामुळे काँग्रेस सावध झाली आहे. ममतांनी मात्र मध्यावधी निवडणुकीची शक्यता फेटाळून लावली. तृणमूलचे खासदार आणि रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी काही दिवसांपूर्वी मध्यावधी निवडणुकांची शक्यता व्यक्त केली होती. त्रिवेदींच्या या वक्तव्यावर ममता नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या मुद्द्यावर तृणमूलच्या नेत्यांनी जाहीरपणे बोलून नये, असा व्हीप ममतांनी बजावल्याचीही माहिती आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 10, 2012 05:34 PM IST

मध्यावधी निवडणुकांची कुजबूज

10 मार्च

आता देशात मध्यावधी निवडणुकांची कुजबूज सुरू झाली. तिसर्‍या आघीडीचे म्हणून ओळखल्या जाणार्‍या नेत्यांनी ममता बॅनजीर्ंना आपल्या गोटात घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पंजाब आणि उत्तर प्रदेशातल्या शपथविधीसाठी शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांनी ममता बॅनजीर्ंना निमंत्रण दिलंय. पण या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याबद्दल ममता बॅनजीर्ंनी अजून आश्वासन दिलेलं नाही. काँग्रेस मात्र या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे. यूपीएच्या अनेक धोरणांना तृणमूल काँग्रेसने अलीकडे जोरदार विरोध केला. त्यामुळे काँग्रेस सावध झाली आहे. ममतांनी मात्र मध्यावधी निवडणुकीची शक्यता फेटाळून लावली. तृणमूलचे खासदार आणि रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी काही दिवसांपूर्वी मध्यावधी निवडणुकांची शक्यता व्यक्त केली होती. त्रिवेदींच्या या वक्तव्यावर ममता नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या मुद्द्यावर तृणमूलच्या नेत्यांनी जाहीरपणे बोलून नये, असा व्हीप ममतांनी बजावल्याचीही माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 10, 2012 05:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close