S M L

गोव्यातला इंडो-वेस्टर्न फ्युजन नृत्याविष्कार

22 नोव्हेंबर, गोवा तुलसीदास चारी गोव्यातला नोव्हेंबर डिसेंबरचा महिना म्हणजे संगीत - नृत्य महोत्सवांचा. गोव्यातल्या रसिकांना नुकतीच इंडो-वेस्टर्न फ्युजन नृत्य पाहण्याची संधी मिळाली. हा फ्युजनाचा कार्यक्रम शक्ती चक्रबर्ती आणि तिच्या गुपनं सादर केला होता. गोव्याच्या कला अकादमीत रसिकांनी ह्या इंडो-वेस्टर्न फ्युजन नृत्याचा आस्वाद लुटला. शक्ती चक्रबर्तीने तिच्या ग्रुप डान्समध्ये भारतीय योगा आणि पाश्चिमात्य जॅझ प्रकाराला एकत्र करून नृत्याचं बाहरदार सादरीकरण केलं. जसं जसं नृत्याचं सादरीकरण होत होतं तस तशी तिच्या नृत्याला उपस्थितांची वाहवा मिळत होती. ऑस्ट्रेलियन नृत्यांगना असणारी शक्ती चक्रबर्ती ही खरंतर भारतीय आणि जपानी वंशाची आहे. शक्ती आणि तिच्या ग्रुपनं गोव्यात नृत्याचं सादरीकरण करण्याची खरंतर ही दुसरी वेळ आहे. शक्तीच्या नृत्याबरोबरीने गोयंकारांच्या चांगलंच लक्षात राहिलं ते तिचं वचन. शक्ती जेव्हा पहिल्यांदा तिचा नृत्याविष्कारासाठी आली होती तेव्हा तिनं परत गोव्याला नृत्याविष्कारासाठी येण्याचं गोयकरांना वचन दिलं होतं. ते शक्तीनं पूर्ण केलं आहे. आता तिने तिस-यांदाही गोव्याला भेट देण्याचं वचन दिलं आहे. गोवा प्रशासनाच्यावतीनं उपस्थित असलेले प्रतापसिंह राणे यांच्याही हा क्षण खासा लक्षात राहिला. 'पुढची भेट कधी हे नक्की नसलं तरी आम्हाला पुन्हा गोव्याला यायला आवडेल,'अशी गोड भावना व्यक्त करत या डान्स ग्रुपनं गोवेकरांना अलविदा केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2008 02:49 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2008 02:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close