S M L

नृत्यगुरु पं. बिरजू महाराज यांना स्वरभास्कर पुरस्कार

21 मार्चपुणे महापालिकेच्यावतीनं दिला जाणारा स्वरभास्कर पुरस्कार यंदा ख्यातनाम नृत्यगुरु पं. बिरजू महाराज यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे ते दुसरे मानकरी ठरले आहेत. येत्या 25 मार्चला प्रख्यात सारंगीवादक पद्मविभुषण पं. रामनारायण यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. 1 लाख 11 हजार 111 रुपये मानपत्र, स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप असणार आहे. पं. भीमसेन जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुणे महापालिकेच्यावतीने हा पुरस्कार दिला जातो. सहकार नगर इथल्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलादालनात हा कार्यक्रम येत्या रविवारी संध्याकाळी सहा वाजता होणार आहे. तर याच कार्यक्रमात नंतर शास्त्रीय गायक पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाची मैफलही सजणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 21, 2012 02:01 PM IST

नृत्यगुरु पं. बिरजू महाराज यांना स्वरभास्कर पुरस्कार

21 मार्च

पुणे महापालिकेच्यावतीनं दिला जाणारा स्वरभास्कर पुरस्कार यंदा ख्यातनाम नृत्यगुरु पं. बिरजू महाराज यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे ते दुसरे मानकरी ठरले आहेत. येत्या 25 मार्चला प्रख्यात सारंगीवादक पद्मविभुषण पं. रामनारायण यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. 1 लाख 11 हजार 111 रुपये मानपत्र, स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप असणार आहे. पं. भीमसेन जोशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुणे महापालिकेच्यावतीने हा पुरस्कार दिला जातो. सहकार नगर इथल्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलादालनात हा कार्यक्रम येत्या रविवारी संध्याकाळी सहा वाजता होणार आहे. तर याच कार्यक्रमात नंतर शास्त्रीय गायक पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाची मैफलही सजणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 21, 2012 02:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close