S M L

'लावणीसाठी सरकारनं गुंडाळली भ्रष्टाचारावरची चर्चा'

02 एप्रिलविधानसभेत आज गृह, उर्जा आणि उद्योग विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा होती. या चर्चेदरम्यान विरोधकांना फारशी संधी न दिल्याने सेना भाजपच्या आमदारांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. विधानसभेत आज भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर चर्चा सुरू होती. पण, सरकारने आज लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जायचं असल्यानंच सरकारने भ्रष्टाचारावरची चर्चा गुंडाळली असा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला. संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी आपली उत्तरं पूर्ण केली. पण यावेळी शेकाप आणि काही अपक्ष आमदार वगळता संपूर्ण विरोधी बाक रिकामा होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 2, 2012 03:09 PM IST

'लावणीसाठी सरकारनं गुंडाळली भ्रष्टाचारावरची चर्चा'

02 एप्रिल

विधानसभेत आज गृह, उर्जा आणि उद्योग विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा होती. या चर्चेदरम्यान विरोधकांना फारशी संधी न दिल्याने सेना भाजपच्या आमदारांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. विधानसभेत आज भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर चर्चा सुरू होती. पण, सरकारने आज लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना जायचं असल्यानंच सरकारने भ्रष्टाचारावरची चर्चा गुंडाळली असा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला. संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी आपली उत्तरं पूर्ण केली. पण यावेळी शेकाप आणि काही अपक्ष आमदार वगळता संपूर्ण विरोधी बाक रिकामा होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2012 03:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close