S M L

गेट वे ऑफ इंडियावर रिपाइंच्या सोहळ्याला परवानगी नाकारली

12 एप्रिलडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 121 व्या जंयती निमित्त 14 एप्रिल रोजी गेट वे ऑफ इंडियाजवळ आरपीआयच्या सोहळ्यासाठी परवानगी मागितली होती पण बीपीटीने ही परवानगी नाकारली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आरपीआय याठिकाणी भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे. पण बीपीटीने परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मध्यस्थी करावी, अशी विनंती आरपीआयच्या नेत्यांनी केली. पण मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत असमर्थतता व्यक्त केली. त्यावर परवानगी मिळाली नाही, तरी गेट वे ऑफ इंडियावर सोहळा होणारच अशी भूमिका आरपीआयने घेतली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 12, 2012 01:28 PM IST

गेट वे ऑफ इंडियावर रिपाइंच्या सोहळ्याला परवानगी नाकारली

12 एप्रिल

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 121 व्या जंयती निमित्त 14 एप्रिल रोजी गेट वे ऑफ इंडियाजवळ आरपीआयच्या सोहळ्यासाठी परवानगी मागितली होती पण बीपीटीने ही परवानगी नाकारली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आरपीआय याठिकाणी भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे. पण बीपीटीने परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मध्यस्थी करावी, अशी विनंती आरपीआयच्या नेत्यांनी केली. पण मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत असमर्थतता व्यक्त केली. त्यावर परवानगी मिळाली नाही, तरी गेट वे ऑफ इंडियावर सोहळा होणारच अशी भूमिका आरपीआयने घेतली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2012 01:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close