S M L

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

14 एप्रिलशिका,संघटीत व्हा,संघर्ष करा हा विचार देणारे दलितांचे कैवारी आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 121 वी जयंती देशभरासह राज्यात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. दिल्लीत संसदेत प्रांगणात महामानवाला अभिवादन करण्यात आलं. पंतप्रधान मनमोहन सिंह, राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि सोनीया गांधी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी आंबेडकरांच्या प्रतिमेला हारार्पण करुन अभिवादन केलं.राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत दादारच्या चैत्यभूमीवर तसेच नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी आज जमा झाले आहे. ज्यांच्यामुळे आज समाजात वावरण्याचा अधिकार मिळाला त्या महानमानवासमोर डोकं टेकवून अभिवादन करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीचं जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. तिकडे नागपुरच्या दीक्षाभुमीत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच भीमसैनिकांची जमायला सुरुवात झाली. दिक्षाभूमी परिसर निळासागराने भरुन गेला. बाबासाहेबांच्या पुतळ्याला आणि स्मारकाला अनुयायांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं. त्नागपुरात समतापर्व साजरेयाचबरोबर महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमीत्त नागपुरात समतापर्व साजर करण्यात येतंय. या अंतर्गत नागपुरात पेंटीग्सचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. मराठा सेवा संघातर्फे रामदासपेठ इथं कार्यक्रमाचं आयोजन केल गेलंय. या प्रदर्शनात चित्रकला महाविद्यायातील तरुण कलाकारांनी बाबासाहेबांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकणारे चित्र साकारले. तर वर्ध्यात बाबासाहेबांची 121 वी जंयती अनोख्या पध्दतीने साजरी कऱण्यात आली. मध्यरात्री 12 वाजताच्या ठोक्याला केक कापून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी फटाक्याची जोरदार आतषबाजी करण्यात आली. परभणीत रक्तदान शिबिराचे आयोजनपरभणीमध्येही मोठ्या उत्साहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 121 जयंती साजरी करण्यात आली. रात्री 12 पासून परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर असणार्‍या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दिवसभरात परभणीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. तसेच काही ठिकाणी रक्तदान शिबिरंही आयोजित करण्यात आली. कोल्हापुरात मर्दाणी खेळ सादरतर पश्चिम महाराष्ट्रात लालमातीच्या शहरात कोल्हापुरमध्ये बाबासाहेबांची 121 वी जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील पालिका चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास मर्दानी खेळ सादर करुन आदरांजली वाहीली. अमोल बुचडे आणि कलाकारांनी खेळ सादर केला. बिंदू चौकातही राज्य कास्ट्राईब कर्मचारी संघटनेसह विविध संघटनांनी बाबासाहेबांना आंदराजली वाहिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 14, 2012 11:24 AM IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

14 एप्रिल

शिका,संघटीत व्हा,संघर्ष करा हा विचार देणारे दलितांचे कैवारी आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 121 वी जयंती देशभरासह राज्यात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. दिल्लीत संसदेत प्रांगणात महामानवाला अभिवादन करण्यात आलं. पंतप्रधान मनमोहन सिंह, राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि सोनीया गांधी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी आंबेडकरांच्या प्रतिमेला हारार्पण करुन अभिवादन केलं.

राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत दादारच्या चैत्यभूमीवर तसेच नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी आज जमा झाले आहे. ज्यांच्यामुळे आज समाजात वावरण्याचा अधिकार मिळाला त्या महानमानवासमोर डोकं टेकवून अभिवादन करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीचं जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. तिकडे नागपुरच्या दीक्षाभुमीत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच भीमसैनिकांची जमायला सुरुवात झाली. दिक्षाभूमी परिसर निळासागराने भरुन गेला. बाबासाहेबांच्या पुतळ्याला आणि स्मारकाला अनुयायांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं. त्

नागपुरात समतापर्व साजरेयाचबरोबर महात्मा ज्योतीबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमीत्त नागपुरात समतापर्व साजर करण्यात येतंय. या अंतर्गत नागपुरात पेंटीग्सचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. मराठा सेवा संघातर्फे रामदासपेठ इथं कार्यक्रमाचं आयोजन केल गेलंय. या प्रदर्शनात चित्रकला महाविद्यायातील तरुण कलाकारांनी बाबासाहेबांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकणारे चित्र साकारले. तर वर्ध्यात बाबासाहेबांची 121 वी जंयती अनोख्या पध्दतीने साजरी कऱण्यात आली. मध्यरात्री 12 वाजताच्या ठोक्याला केक कापून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी फटाक्याची जोरदार आतषबाजी करण्यात आली. परभणीत रक्तदान शिबिराचे आयोजन

परभणीमध्येही मोठ्या उत्साहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 121 जयंती साजरी करण्यात आली. रात्री 12 पासून परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर असणार्‍या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दिवसभरात परभणीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. तसेच काही ठिकाणी रक्तदान शिबिरंही आयोजित करण्यात आली.

कोल्हापुरात मर्दाणी खेळ सादर

तर पश्चिम महाराष्ट्रात लालमातीच्या शहरात कोल्हापुरमध्ये बाबासाहेबांची 121 वी जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील पालिका चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्यास मर्दानी खेळ सादर करुन आदरांजली वाहीली. अमोल बुचडे आणि कलाकारांनी खेळ सादर केला. बिंदू चौकातही राज्य कास्ट्राईब कर्मचारी संघटनेसह विविध संघटनांनी बाबासाहेबांना आंदराजली वाहिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 14, 2012 11:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close