S M L

आनंदवनाला अविनाश भोसलेंनी दिलेला निधी वादात

14 एप्रिलवादग्रस्त व्यावसायिक अविनाश भोसलेंच्या अबिल फाउंडेशनने बाबा आमटेंच्या आनंदवनाला 3 कोटी 8 लाख रुपयांची मदत केली. पण असा वादग्रस्त निधी स्वीकारण्याला समाजातल्या विविध स्तरांतून विरोध होतोय. आनंदवन....कुष्ठरोग्यांसाठी बाबा आमटेंनी उभारलेलं नंदनवन...समाजाने नाकारलेल्या ह्या कुष्ठरोग्यांना बाबांनी आधार दिला. ताठ मानेनं जगण्याचं एक मोकळं विश्व दिलं ते आनंदवनच्या माध्यमातून. याच आनंदवनाला आता मदतीची गरज आहे. आणि ठिकठिकाणाहून मदतीचे हातही पुढे येतात. पण पुण्यातल्या एका कार्यक्रमात महेंद्रसिंग ढोणीच्या हस्ते वादग्रस्त व्यावसायिक अनिल भोसलेंच्या अबिल फाऊंडेशनकडून 3 कोटींचा निधी, मदत म्हणून दिला गेला आणि वादाला तोंड फुटलं.या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर विकास आमटेंनी मात्र त्यांची भूमिका अशी स्पष्ट केली. आनंदवनाची उभारणी करताना बाबा आमटेंनी जे कष्ट उपसले.. कुष्ठरोग्यांची सेवा केली. ज्या आनंदवनाच्या उभारणीत बाबांच्या बरोबरीने साधनाताईंनीही आयुष्याची समीधा वाहिली. त्याला अशा वादग्रस्त मदतीनं कुठं गालबोट लागू नये हीच अपेक्षा....

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 14, 2012 12:06 PM IST

आनंदवनाला अविनाश भोसलेंनी दिलेला निधी वादात

14 एप्रिल

वादग्रस्त व्यावसायिक अविनाश भोसलेंच्या अबिल फाउंडेशनने बाबा आमटेंच्या आनंदवनाला 3 कोटी 8 लाख रुपयांची मदत केली. पण असा वादग्रस्त निधी स्वीकारण्याला समाजातल्या विविध स्तरांतून विरोध होतोय.

आनंदवन....कुष्ठरोग्यांसाठी बाबा आमटेंनी उभारलेलं नंदनवन...समाजाने नाकारलेल्या ह्या कुष्ठरोग्यांना बाबांनी आधार दिला. ताठ मानेनं जगण्याचं एक मोकळं विश्व दिलं ते आनंदवनच्या माध्यमातून. याच आनंदवनाला आता मदतीची गरज आहे. आणि ठिकठिकाणाहून मदतीचे हातही पुढे येतात. पण पुण्यातल्या एका कार्यक्रमात महेंद्रसिंग ढोणीच्या हस्ते वादग्रस्त व्यावसायिक अनिल भोसलेंच्या अबिल फाऊंडेशनकडून 3 कोटींचा निधी, मदत म्हणून दिला गेला आणि वादाला तोंड फुटलं.

या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर विकास आमटेंनी मात्र त्यांची भूमिका अशी स्पष्ट केली. आनंदवनाची उभारणी करताना बाबा आमटेंनी जे कष्ट उपसले.. कुष्ठरोग्यांची सेवा केली. ज्या आनंदवनाच्या उभारणीत बाबांच्या बरोबरीने साधनाताईंनीही आयुष्याची समीधा वाहिली. त्याला अशा वादग्रस्त मदतीनं कुठं गालबोट लागू नये हीच अपेक्षा....

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 14, 2012 12:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close