S M L

नक्षलवाद्यांनी केलं जिल्हाधिकार्‍यांचे अपहरण

21 एप्रिलछत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी सुखमाच्या जिल्ह्याधिकारी ऍलेक्स पॉल मेनन यांचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. जिल्हाधिकार्‍यांचं अपहरण करुन त्यांच्या दोन बॉडीगार्ड्सला ठार मारले. ऍलेक्स पॉल मेनन शेजारी गावातून ग्राम स्वराज अभियान कार्यक्रम आटपून परतत होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला. त्यांच्या अपहरणाबद्दल पोलीस दल तपास घेत आहे. मात्र त्यांच्याबद्दल इतर माहिती अजून मिळू शकली नाही. मागिल महिन्यात नक्षलवाद्यांनी एका आमदार आणि दोन इटालियन पर्यटकांचे अपहरण केले होते. ह्या घटना ताज्या असतानाच आज आणखी एक अपहरण नाट्य घडलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 21, 2012 01:43 PM IST

नक्षलवाद्यांनी केलं जिल्हाधिकार्‍यांचे अपहरण

21 एप्रिल

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी सुखमाच्या जिल्ह्याधिकारी ऍलेक्स पॉल मेनन यांचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. जिल्हाधिकार्‍यांचं अपहरण करुन त्यांच्या दोन बॉडीगार्ड्सला ठार मारले. ऍलेक्स पॉल मेनन शेजारी गावातून ग्राम स्वराज अभियान कार्यक्रम आटपून परतत होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला चढवला. त्यांच्या अपहरणाबद्दल पोलीस दल तपास घेत आहे. मात्र त्यांच्याबद्दल इतर माहिती अजून मिळू शकली नाही. मागिल महिन्यात नक्षलवाद्यांनी एका आमदार आणि दोन इटालियन पर्यटकांचे अपहरण केले होते. ह्या घटना ताज्या असतानाच आज आणखी एक अपहरण नाट्य घडलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2012 01:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close