S M L

राज्यभरात महाराष्ट्र दिन उत्साहात

01 मेआज 52 वा महाराष्ट्र दिन...महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला आज 52 वर्षं पूर्ण झाली. 1 मे, 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यासाठी कामगार, मुंबईतले स्थानिक, सामाजिक कार्यकर्ते अशा 106 जणांनी बलिदान केलं होतं. राज्यभरातही आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईतील हुतात्मा चौकात आज राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गर्दी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे खासदार तारिक अन्वर यांनीही हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले आमने सामने आले. तर दुसरीकडे महाराष्ट्रदिनी यवतमाळमध्ये स्वतंत्र विदर्भ समर्थकांनी काळे झेंडे दाखवत राज्य सरकारचा निषेध केला. कार्यकर्त्यांनी आजचा दिवस हा काळा दिवस म्हणून साजरा केला. जाबुवंतराव धोटे एकदिवसाचं उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत विदर्भ जनता काँग्रेसचे कार्यकर्तेही उपोषणाला बसलेत. कार्यकर्त्यांनी काळे झेंडे घेवून महाराष्ट्रदिनाचा निषेधाच्या घोषणा दिल्या.

आईबीएन लोकमत | Updated On: May 1, 2012 07:31 AM IST

राज्यभरात महाराष्ट्र दिन उत्साहात

01 मे

आज 52 वा महाराष्ट्र दिन...महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला आज 52 वर्षं पूर्ण झाली. 1 मे, 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यासाठी कामगार, मुंबईतले स्थानिक, सामाजिक कार्यकर्ते अशा 106 जणांनी बलिदान केलं होतं. राज्यभरातही आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईतील हुतात्मा चौकात आज राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गर्दी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे खासदार तारिक अन्वर यांनीही हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले आमने सामने आले. तर दुसरीकडे महाराष्ट्रदिनी यवतमाळमध्ये स्वतंत्र विदर्भ समर्थकांनी काळे झेंडे दाखवत राज्य सरकारचा निषेध केला. कार्यकर्त्यांनी आजचा दिवस हा काळा दिवस म्हणून साजरा केला. जाबुवंतराव धोटे एकदिवसाचं उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत विदर्भ जनता काँग्रेसचे कार्यकर्तेही उपोषणाला बसलेत. कार्यकर्त्यांनी काळे झेंडे घेवून महाराष्ट्रदिनाचा निषेधाच्या घोषणा दिल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2012 07:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close