S M L

'सत्यमेव जयते'वर संगीत चोरीचा आरोप

07 मेमिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या 'सत्यमेव जयते' या पहिल्याच कार्यक्रमानं प्रेक्षकांची मनं जिंकली. पण आमिरचा हा पहिलाच रिऍलिटी शो वादातही अडकलाय. या शोचं टायटल साँग असलेल्या सत्यमेव जयतेचं संगीत चोरल्याचा आरोप युफोरिया बँडचे पलाश सेन यांनी केला आहे. 'फिर भूम' या आपल्या अल्बममधीलं संगीत चोरल्याचा त्यांचा आरोप आहे. पण पलाश यांनी याबाबत सध्यातरी कुठलीच तक्रार दाखल केलेली नाही. या अगोदरही अनेक चित्रपट आणि मालिकांनी संगीत चोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत. पण कित्येकवेळा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याबद्दल काय खुलासा करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 7, 2012 04:50 PM IST

'सत्यमेव जयते'वर संगीत चोरीचा आरोप

07 मे

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या 'सत्यमेव जयते' या पहिल्याच कार्यक्रमानं प्रेक्षकांची मनं जिंकली. पण आमिरचा हा पहिलाच रिऍलिटी शो वादातही अडकलाय. या शोचं टायटल साँग असलेल्या सत्यमेव जयतेचं संगीत चोरल्याचा आरोप युफोरिया बँडचे पलाश सेन यांनी केला आहे. 'फिर भूम' या आपल्या अल्बममधीलं संगीत चोरल्याचा त्यांचा आरोप आहे. पण पलाश यांनी याबाबत सध्यातरी कुठलीच तक्रार दाखल केलेली नाही. या अगोदरही अनेक चित्रपट आणि मालिकांनी संगीत चोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत. पण कित्येकवेळा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याबद्दल काय खुलासा करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 7, 2012 04:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close