S M L

सुरुवात आपल्यापासून करावी - आमिर

09 मेकोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही आपल्यापासून होते. देशाच्या परिस्थिती बदल झाला पाहिजे, अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे असं म्हणण्यापेक्षा याची सुरुवात ही स्वत:पासून केली पाहिजे. स्त्री भ्रूण हत्येबद्दल आम्ही दाखवलं. पण अशा आणि अनेक घटना आपल्या आसपास घडत असतात. पण आपण त्या करणार नाही आणि दुसर्‍या कोणालाही करु देणार नाही फक्त एवढंच करायच असतं असं मत आमिर खानने व्यक्त केलं. तसेच मी एक एन्टरटेनर आहे मला लोकांना हसवायला आवडतं,लोकांच्या मनाला स्पर्श करु वाटतं हे माझं काम आहे पण मी सामाजिक कार्यकर्ता नाही असंही आमिर म्हणाला. 'सत्यमेव जयते' कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतर आज आमिर खानने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोट यांची भेट घेतली. गहलोट यांनी स्त्री भ्रूण हत्या प्रकरणी फास्ट ट्रक कोर्ट सुरु करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. आमिरने सत्यमेव जयते या कार्यक्रमातून चांगला विषय समाजासमोर आणला आहे. त्याचा हा उपक्रम अत्यंत चांगला आहे असंही गहलोट म्हणाले. गहलोट आणि आमिर खान यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.मी एक एंटरटेनर आहे ते मला चांगले जमते. मी सिनेमे बनवतो लोकांना हसवणे जमते, मला लोकांच्या भावनांना स्पर्श करु वाटतो. मला लोकांच्या मनापर्यंत पोहचायचे आहे. हा कार्यक्रम असो अथवा माझा येणार सिनेमा 'धूम 3' असो मी एक एंटरटेनर आहे पण मी सामाजिक कार्यकर्ता नाही असंही आमिरने स्पष्ट केलं.तसेच कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही आपल्यापासून होते. स्त्री भ्रूण हत्येबद्दल आम्ही दाखवलं. कोणतीही गोष्ट लोकांपर्यंत कशी पोहचते हे महत्वाचे आहे ते मी या माध्यमातून केलं आहे. स्त्री भ्रूण हत्ये सारख्या घटना आपल्या आसपास घडल्यात पण आपण त्या करणार नाही फक्त एवढंच करायचं आहे. त्यांना पकडणे, त्यांच्यावर कारवाई करणे हे पोलिसांचे, कायदाचे काम आहे हे त्यांच्यावर सोपवले पाहिजे. मला मनापासून हा कार्यक्रम करु वाटला आणि मी तो करत आहे असंही आमिर म्हणाला. रविवारी प्रदर्शित झालेल्या सत्यमेव जयते शोमध्ये स्त्री भ्रूण हत्येवर प्रकाश टाकला. याची दखल घेतं मध्यप्रदेशच्या आरोग्य मंत्रालयाने 65 गर्भनिदान केंद्रानं टाळं ठोकलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 9, 2012 02:40 PM IST

सुरुवात आपल्यापासून करावी - आमिर

09 मे

कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही आपल्यापासून होते. देशाच्या परिस्थिती बदल झाला पाहिजे, अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे असं म्हणण्यापेक्षा याची सुरुवात ही स्वत:पासून केली पाहिजे. स्त्री भ्रूण हत्येबद्दल आम्ही दाखवलं. पण अशा आणि अनेक घटना आपल्या आसपास घडत असतात. पण आपण त्या करणार नाही आणि दुसर्‍या कोणालाही करु देणार नाही फक्त एवढंच करायच असतं असं मत आमिर खानने व्यक्त केलं. तसेच मी एक एन्टरटेनर आहे मला लोकांना हसवायला आवडतं,लोकांच्या मनाला स्पर्श करु वाटतं हे माझं काम आहे पण मी सामाजिक कार्यकर्ता नाही असंही आमिर म्हणाला.

'सत्यमेव जयते' कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतर आज आमिर खानने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोट यांची भेट घेतली. गहलोट यांनी स्त्री भ्रूण हत्या प्रकरणी फास्ट ट्रक कोर्ट सुरु करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. आमिरने सत्यमेव जयते या कार्यक्रमातून चांगला विषय समाजासमोर आणला आहे. त्याचा हा उपक्रम अत्यंत चांगला आहे असंही गहलोट म्हणाले. गहलोट आणि आमिर खान यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.

मी एक एंटरटेनर आहे ते मला चांगले जमते. मी सिनेमे बनवतो लोकांना हसवणे जमते, मला लोकांच्या भावनांना स्पर्श करु वाटतो. मला लोकांच्या मनापर्यंत पोहचायचे आहे. हा कार्यक्रम असो अथवा माझा येणार सिनेमा 'धूम 3' असो मी एक एंटरटेनर आहे पण मी सामाजिक कार्यकर्ता नाही असंही आमिरने स्पष्ट केलं.

तसेच कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ही आपल्यापासून होते. स्त्री भ्रूण हत्येबद्दल आम्ही दाखवलं. कोणतीही गोष्ट लोकांपर्यंत कशी पोहचते हे महत्वाचे आहे ते मी या माध्यमातून केलं आहे. स्त्री भ्रूण हत्ये सारख्या घटना आपल्या आसपास घडल्यात पण आपण त्या करणार नाही फक्त एवढंच करायचं आहे. त्यांना पकडणे, त्यांच्यावर कारवाई करणे हे पोलिसांचे, कायदाचे काम आहे हे त्यांच्यावर सोपवले पाहिजे. मला मनापासून हा कार्यक्रम करु वाटला आणि मी तो करत आहे असंही आमिर म्हणाला. रविवारी प्रदर्शित झालेल्या सत्यमेव जयते शोमध्ये स्त्री भ्रूण हत्येवर प्रकाश टाकला. याची दखल घेतं मध्यप्रदेशच्या आरोग्य मंत्रालयाने 65 गर्भनिदान केंद्रानं टाळं ठोकलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2012 02:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close