S M L

मी माफी मागणार नाही - शाहरुख

17 मेकाल संध्याकाळी माझ्या टीमने मॅच जिंकली यानंतर माझी मुलं मैदानावर होती मी त्यांना घेण्यासाठी गेलो असता एमसीएच्या सुरक्षारक्षकांनी मुलीचा हात ओढून तीला बाजूला केले मी त्या याबद्दल विचारले पण त्यांनी माझ्याशी गैरवर्तन केलं त्यांनी मला अपमानस्पद वागणूक दिली. या प्रकरणाची त्यांनीच पहिली सुरुवात केली. त्यामुळे मी चिडलो आणि त्यांना शिवीगाळ केली. मी दारु प्यायलेलो नव्हतो त्यांनी याबद्दल माझी माफी मागीतली पाहिजे, मी त्यांची माफी बिल्कुल मागणार नाही असा खुलासा शाहरुख खानने केला. शाहरुखने आपल्या घरी मन्नत बंगल्यावर पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. काल बुधवारी वानखेडे स्टेडियअवर कोलकाताने मुंबई टीमचा पराभव केला. पण या विजयानंतर मैदानावर किंग खानची सुरक्षारक्षकांसोबत बाचाबाची झाली. शाहरुखने सुरक्षकांना शिवीगाळ केल्याच्या आरोप करण्यात आला आहे. आणि त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल शाहरुखने आपल्या घरी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. मॅच जिंकल्यानंतर माझी मुलं मैदानावर आनंद साजरा करत होती. मी त्यांना घेण्यासाठी मैदानावर गेलो यावेळी मला सुरक्षारक्षकांनी अडवले. माझ्या मुलांचा हात पकडून त्यांना बाजूला केले मी त्यांना याबद्दल विचारले असता त्यांनी माझ्याशी गैरवर्तन केलं. मुलांना बाजूला का ढकलले असा सवाल त्यांना केला. पण त्यांनी मला मराठीत शिवीगाळ केली. मी त्यांना हिंदीत बोलण्यास सांगितले. पण ते ऐकायला तयार नव्हते अखेर मी चिडून त्यांना प्रतिउत्तर दिले. मीही त्यांना शिवीगाळ केली. माझ्याशी त्यांनी धक्काबुक्की केली. मी एक फिल्मस्टार आहे, आयपीएलच्या एका टीमचा मालक आहे हे ते कसे विसरले. यावेळी मी दारु प्यायलेलो नव्हतो माझ्यावर विनाकारण आरोप केले जात आहे. आणि मी कोणत्याही मुलीला शिवीगाळ केली नाही. माझ्यावर जर कोणतीही कारवाई करायची असेल तर खुशाल करा पण मी कोणाचीही माफी मागणार नाही. त्यांची चुकी आहे त्यांनी याची सुरुवात केली त्यांनी याबद्दल माफी मागावी असं स्पष्टीकरण शाहरुख खानने दिलं. तसेच जर कोणतीही कारवाई होत असेल तर त्याला माझे वकिल उत्तर देतील असं शाहरुखने स्पष्ट केलं. संबंधित बातम्याशाहरुखचा खुलासा शाहरुखबद्दल विलासरावांची सावध भूमिका वानखेडेवर 'डॉन' इन अ ॅक्शन ! ऐका शाहरुखचं भांडण शाहरुखचा वानखेडेवर राडाशाहरुखवर गुन्हा दाखल

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2012 06:07 PM IST

मी माफी मागणार नाही - शाहरुख

17 मे

काल संध्याकाळी माझ्या टीमने मॅच जिंकली यानंतर माझी मुलं मैदानावर होती मी त्यांना घेण्यासाठी गेलो असता एमसीएच्या सुरक्षारक्षकांनी मुलीचा हात ओढून तीला बाजूला केले मी त्या याबद्दल विचारले पण त्यांनी माझ्याशी गैरवर्तन केलं त्यांनी मला अपमानस्पद वागणूक दिली. या प्रकरणाची त्यांनीच पहिली सुरुवात केली. त्यामुळे मी चिडलो आणि त्यांना शिवीगाळ केली. मी दारु प्यायलेलो नव्हतो त्यांनी याबद्दल माझी माफी मागीतली पाहिजे, मी त्यांची माफी बिल्कुल मागणार नाही असा खुलासा शाहरुख खानने केला. शाहरुखने आपल्या घरी मन्नत बंगल्यावर पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.

काल बुधवारी वानखेडे स्टेडियअवर कोलकाताने मुंबई टीमचा पराभव केला. पण या विजयानंतर मैदानावर किंग खानची सुरक्षारक्षकांसोबत बाचाबाची झाली. शाहरुखने सुरक्षकांना शिवीगाळ केल्याच्या आरोप करण्यात आला आहे. आणि त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल शाहरुखने आपल्या घरी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. मॅच जिंकल्यानंतर माझी मुलं मैदानावर आनंद साजरा करत होती. मी त्यांना घेण्यासाठी मैदानावर गेलो यावेळी मला सुरक्षारक्षकांनी अडवले. माझ्या मुलांचा हात पकडून त्यांना बाजूला केले मी त्यांना याबद्दल विचारले असता त्यांनी माझ्याशी गैरवर्तन केलं. मुलांना बाजूला का ढकलले असा सवाल त्यांना केला. पण त्यांनी मला मराठीत शिवीगाळ केली. मी त्यांना हिंदीत बोलण्यास सांगितले.

पण ते ऐकायला तयार नव्हते अखेर मी चिडून त्यांना प्रतिउत्तर दिले. मीही त्यांना शिवीगाळ केली. माझ्याशी त्यांनी धक्काबुक्की केली. मी एक फिल्मस्टार आहे, आयपीएलच्या एका टीमचा मालक आहे हे ते कसे विसरले. यावेळी मी दारु प्यायलेलो नव्हतो माझ्यावर विनाकारण आरोप केले जात आहे. आणि मी कोणत्याही मुलीला शिवीगाळ केली नाही. माझ्यावर जर कोणतीही कारवाई करायची असेल तर खुशाल करा पण मी कोणाचीही माफी मागणार नाही. त्यांची चुकी आहे त्यांनी याची सुरुवात केली त्यांनी याबद्दल माफी मागावी असं स्पष्टीकरण शाहरुख खानने दिलं. तसेच जर कोणतीही कारवाई होत असेल तर त्याला माझे वकिल उत्तर देतील असं शाहरुखने स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या

शाहरुखचा खुलासा शाहरुखबद्दल विलासरावांची सावध भूमिका वानखेडेवर 'डॉन' इन अ ॅक्शन ! ऐका शाहरुखचं भांडण शाहरुखचा वानखेडेवर राडाशाहरुखवर गुन्हा दाखल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2012 06:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close