S M L

शाहरुखवर गुन्हा दाखल

17 मेवानखेडे स्टेडियमवर सुरक्षारक्षकांना मारहाण प्रकरणी अखेर शाहरुख खानविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता याप्रकरणी सविस्तर चर्चा करण्यासाठी एमसीएचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी उद्या बैठक बोलावली आहे. तसेच शाहरुखला वानखेडेवर प्रवेश करायला आजन्म बंदी घालण्याची कडक कारवाई करण्याचे संकेतही बीसीसीआयने दिले आहे. असं झाल्यास शाहरुखला फक्त आयपीएल नाहीतर वानखेडेवरच्या वनडे आणि टेस्ट सामन्यानाही मुकावे लागेल. काल बुधवारी वानखेडे स्टेडियअवर कोलकाताने मुंबई टीमचा पराभव केला. पण या विजयानंतर मैदानावर किंग खानची सुरक्षारक्षकांसोबत बाचाबाची झाली. शाहरुखने सुरक्षकांना शिवीगाळ केली तसेच त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल शाहरुखने आपल्या घरी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. मॅच जिंकल्यानंतर माझी मुलं मैदानावर आनंद साजरा करत होती. मी त्यांना घेण्यासाठी मैदानावर गेलो यावेळी मला सुरक्षारक्षकांनी अडवले. माझ्या मुलांचा हात पकडून त्यांना बाजूला केले मी त्यांना याबद्दल विचारले असता त्यांनी माझ्याशी गैरवर्तन केलं. मुलांना बाजूला का ढकलले असा सवाल त्यांना केला. पण त्यांनी मला मराठीत शिवीगाळ केली. मी त्यांना हिंदीत बोलण्यास सांगितले. पण ते ऐकायला तयार नव्हते अखेर मी चिडून त्यांना प्रतिउत्तर दिले. मीही त्यांना शिवीगाळ केली. माझ्याशी त्यांनी धक्काबुक्की केली. मी एक फिल्मस्टार आहे, आयपीएलच्या एका टीमचा मालक आहे हे ते कसे विसरले. यावेळी मी दारु प्यायलेलो नव्हतो माझ्यावर विनाकारण आरोप केले जात आहे. आणि मी कोणत्याही मुलीला शिवीगाळ केली नाही. माझ्यावर जर कोणतीही कारवाई करायची असेल तर खुशाल करा पण मी कोणाचीही माफी मागणार नाही. त्यांची चुकी आहे त्यांनी याची सुरुवात केली त्यांनी याबद्दल माफी मागावी असं स्पष्टीकरण शाहरुख खानने दिलं. तसेच जर कोणतीही कारवाई होत असेल तर त्याला माझे वकिल उत्तर देतील असं शाहरुखने स्पष्ट केलं. संबंधित बातम्याशाहरुखचा खुलासा शाहरुखबद्दल विलासरावांची सावध भूमिका वानखेडेवर 'डॉन' इन अ ॅक्शन ! ऐका शाहरुखचं भांडण जशाच तसे उत्तर दिले -शाहरुख शाहरुखचा वानखेडेवर राडा

आईबीएन लोकमत | Updated On: May 17, 2012 03:17 PM IST

शाहरुखवर गुन्हा दाखल

17 मेवानखेडे स्टेडियमवर सुरक्षारक्षकांना मारहाण प्रकरणी अखेर शाहरुख खानविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता याप्रकरणी सविस्तर चर्चा करण्यासाठी एमसीएचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी उद्या बैठक बोलावली आहे. तसेच शाहरुखला वानखेडेवर प्रवेश करायला आजन्म बंदी घालण्याची कडक कारवाई करण्याचे संकेतही बीसीसीआयने दिले आहे. असं झाल्यास शाहरुखला फक्त आयपीएल नाहीतर वानखेडेवरच्या वनडे आणि टेस्ट सामन्यानाही मुकावे लागेल.

काल बुधवारी वानखेडे स्टेडियअवर कोलकाताने मुंबई टीमचा पराभव केला. पण या विजयानंतर मैदानावर किंग खानची सुरक्षारक्षकांसोबत बाचाबाची झाली. शाहरुखने सुरक्षकांना शिवीगाळ केली तसेच त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल शाहरुखने आपल्या घरी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. मॅच जिंकल्यानंतर माझी मुलं मैदानावर आनंद साजरा करत होती. मी त्यांना घेण्यासाठी मैदानावर गेलो यावेळी मला सुरक्षारक्षकांनी अडवले. माझ्या मुलांचा हात पकडून त्यांना बाजूला केले मी त्यांना याबद्दल विचारले असता त्यांनी माझ्याशी गैरवर्तन केलं.

मुलांना बाजूला का ढकलले असा सवाल त्यांना केला. पण त्यांनी मला मराठीत शिवीगाळ केली. मी त्यांना हिंदीत बोलण्यास सांगितले. पण ते ऐकायला तयार नव्हते अखेर मी चिडून त्यांना प्रतिउत्तर दिले. मीही त्यांना शिवीगाळ केली. माझ्याशी त्यांनी धक्काबुक्की केली. मी एक फिल्मस्टार आहे, आयपीएलच्या एका टीमचा मालक आहे हे ते कसे विसरले. यावेळी मी दारु प्यायलेलो नव्हतो माझ्यावर विनाकारण आरोप केले जात आहे. आणि मी कोणत्याही मुलीला शिवीगाळ केली नाही. माझ्यावर जर कोणतीही कारवाई करायची असेल तर खुशाल करा पण मी कोणाचीही माफी मागणार नाही. त्यांची चुकी आहे त्यांनी याची सुरुवात केली त्यांनी याबद्दल माफी मागावी असं स्पष्टीकरण शाहरुख खानने दिलं. तसेच जर कोणतीही कारवाई होत असेल तर त्याला माझे वकिल उत्तर देतील असं शाहरुखने स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या

शाहरुखचा खुलासा शाहरुखबद्दल विलासरावांची सावध भूमिका वानखेडेवर 'डॉन' इन अ ॅक्शन ! ऐका शाहरुखचं भांडण जशाच तसे उत्तर दिले -शाहरुख शाहरुखचा वानखेडेवर राडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 17, 2012 03:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close