S M L

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच - मुख्यमंत्री

25 नोव्हेंबर, कराडयेत्या दोन दिवसांत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची घोषणा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केली आहे. कराड इथं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते. याआधी कृषीमंत्री शरद पवार यांनी मंत्रीमंडळ विस्ताराचे संकेत दिले होते. पवारांच्या शब्दाचा मान राखत विस्तार करणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुंबईचे नवाब मलिक, जळगावचे सतिश पाटील, अकोल्याचे सुभाष ठाकरे यांची नावं संभाव्य यादीत आहेत. सध्या नगरविकासराज्यमंत्री असलेले राजेश टोपे यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून पुण्याचे बाळासाहेब शिवरकर, कोल्हापूरचे पी. एन पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना वगळलं जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी नागपूरचे नितीन राऊत किंवा मुंबईतले जनार्दन चांदूरकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. याशिवाय अनेक इच्छुक देव पाण्यात घालून बसलेत. त्यांच्या हाती काय लागणार, हे लवकरच कळेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 25, 2008 05:53 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2008 05:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close