S M L

राज्यात बंदला हिंसक वळण

31 मेपेट्रोल दरवाढीच्या विरोधात एनडीएने पुकारलेल्या देशव्यापी बंदला राज्यात हिंसक वळण लागलं आहे. मुंबईसह पुण्यात 83 बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. मुंबईत 68 बेस्टच्या बसेसवर दगडफेक करण्यात आली. जांबोरी मैदानाजवळ रिपाई कार्यकर्त्यांनी तीन बेस्टच्या बसेस फोडल्या आहेत. तर पुण्यात पीएमटीच्या 15बसेस फोडण्यात आल्या आहेत. 6 गाड्या काँग्रेस भवन इथं पार्किंगमध्येच फोडण्यात आल्या दोन बसेस डेक्कन परिसरात फोडण्यात आल्या आणि त्या बसेसची हवाही काढण्यात आली. 4 बसेस कोथरूड परिसरात फोडण्यात आल्या.नागपूरमध्ये 5 बसेसची तर ठाण्यात एका बसची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच देशभरातल्या सर्व मोठ्या शहरांमध्ये दुकानं, टॅक्सी, ऑटो बंद असल्याचं चित्र आहे. काही ठिकाणी रेल्वेही अडवण्यात आल्यात. राज्यातही बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय,मुंबई,पुणे नागपूर, कोल्हापूरमध्ये बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत.तर काही ठिकाणी जबरदस्तीनं दुकानं बंद करायला लावण्यात आली आहे.सुधीर मुनगंटीवार यांच्यासह 100 कार्यकर्त्यांना अटकमुलुंडमध्ये आंदोलन करणार्‍या भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्यासह 100 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या भागात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करत बसेस रोखल्या, त्यानंतर रस्त्यावरचं भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी ठाण मांडून बसले त्यामुळे काही वेळ या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. मुनंगटीवार यांच्यासोबत आमदार सरदार तारासिंग, राज पुरोहीत आणि किरीट सोमय्या यांंनाही ताब्यात घेतलंय. रामदास आठवले पोलिसांच्या ताब्यातखेरवाडी भागात रिपाई नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केलं. पोलिसांनी रामदास आठवले यांच्यासोबत रिपाई कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. आठवले यांना बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलंय. त्यांच्या अटकेच वृत्त समजताच मुलूंड, चेबुरमध्ये रिपाई कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले आहे.औरंगाबादेत पेट्रोल पंपाची तोडफोडऔरंगाबाद शहरात भारत बंदला चांगला प्रसिसाद मिळातोय. सेना, भाजप, रिपाई कार्यकर्त्यांनी पैठण गेट, तिलक पथ, गुलमंडी भागात या कार्यकर्त्यांनी पेट्रोल दरवाढी विरोधात तसेच काँग्रेस सरकार विरोधात घोषणा देत दुकान बंद ठेवणाचे आवाहन केले. शहराच्या मुख्य भागांमध्ये बंदला चांगला प्रतिसाद दिसुन आला. तसेच क्रांती चौकातील पेट्रोल पंपाची भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. परभणीत कडकडीत बंदपेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंदला परभणीत चांगला प्रतिसाद मिळतोय. आज सकाळपासून व्यापार्‍यांनी आपली दुकानं बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग नोंदवला. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला शिवाजी चौक हा कडकडीत बंद होता तर कापड बाजार गुजरी बाजार जुना मोंढा भागातील ही व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंदच ठेवली.मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्नअकोल्यात भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री जात असतांना काही भाजप, नगरसेवकांनी मुख्यमंत्र्याना काळे झेंडे दाखवून पेट्रोल दरवाढीचा निषेध केला. पोलिसांनी भाजपच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.जळगावात बैलगाडीवरुन रॅलीदेशव्यापी बंदला जळगावात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील सर्व प्रमुख मार्गावरुन भाजपने रॅली काढून या बंद मध्ये सहभागी होण्याचं आवाहन लोकांना केलं. बैलगाडीवरुन निघालेल्या या रॅलीचं नेतृत्व विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केलं. व्यापारी संघटनानंीही पाठिंबा दिल्यानं शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठ बंद आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहेयखेडमध्ये कडकडीत बंदरत्नागिरी जिल्ह्यात खेड मध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला. खेड मधील बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. तसेच मुंबई - गोवा महामार्गावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा महामार्गावर जोरदार घोषणा बाजी करत टायर जाळून काही वेळ वाहतूक रोखून धरली.

आईबीएन लोकमत | Updated On: May 31, 2012 06:07 AM IST

राज्यात बंदला हिंसक वळण

31 मे

पेट्रोल दरवाढीच्या विरोधात एनडीएने पुकारलेल्या देशव्यापी बंदला राज्यात हिंसक वळण लागलं आहे. मुंबईसह पुण्यात 83 बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. मुंबईत 68 बेस्टच्या बसेसवर दगडफेक करण्यात आली. जांबोरी मैदानाजवळ रिपाई कार्यकर्त्यांनी तीन बेस्टच्या बसेस फोडल्या आहेत. तर पुण्यात पीएमटीच्या 15बसेस फोडण्यात आल्या आहेत. 6 गाड्या काँग्रेस भवन इथं पार्किंगमध्येच फोडण्यात आल्या दोन बसेस डेक्कन परिसरात फोडण्यात आल्या आणि त्या बसेसची हवाही काढण्यात आली. 4 बसेस कोथरूड परिसरात फोडण्यात आल्या.नागपूरमध्ये 5 बसेसची तर ठाण्यात एका बसची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच देशभरातल्या सर्व मोठ्या शहरांमध्ये दुकानं, टॅक्सी, ऑटो बंद असल्याचं चित्र आहे. काही ठिकाणी रेल्वेही अडवण्यात आल्यात. राज्यातही बंदला चांगला प्रतिसाद मिळतोय,मुंबई,पुणे नागपूर, कोल्हापूरमध्ये बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत.तर काही ठिकाणी जबरदस्तीनं दुकानं बंद करायला लावण्यात आली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांच्यासह 100 कार्यकर्त्यांना अटक

मुलुंडमध्ये आंदोलन करणार्‍या भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्यासह 100 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या भागात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करत बसेस रोखल्या, त्यानंतर रस्त्यावरचं भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी ठाण मांडून बसले त्यामुळे काही वेळ या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. मुनंगटीवार यांच्यासोबत आमदार सरदार तारासिंग, राज पुरोहीत आणि किरीट सोमय्या यांंनाही ताब्यात घेतलंय.

रामदास आठवले पोलिसांच्या ताब्यात

खेरवाडी भागात रिपाई नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केलं. पोलिसांनी रामदास आठवले यांच्यासोबत रिपाई कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. आठवले यांना बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलंय. त्यांच्या अटकेच वृत्त समजताच मुलूंड, चेबुरमध्ये रिपाई कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले आहे.

औरंगाबादेत पेट्रोल पंपाची तोडफोड

औरंगाबाद शहरात भारत बंदला चांगला प्रसिसाद मिळातोय. सेना, भाजप, रिपाई कार्यकर्त्यांनी पैठण गेट, तिलक पथ, गुलमंडी भागात या कार्यकर्त्यांनी पेट्रोल दरवाढी विरोधात तसेच काँग्रेस सरकार विरोधात घोषणा देत दुकान बंद ठेवणाचे आवाहन केले. शहराच्या मुख्य भागांमध्ये बंदला चांगला प्रतिसाद दिसुन आला. तसेच क्रांती चौकातील पेट्रोल पंपाची भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.

परभणीत कडकडीत बंद

पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंदला परभणीत चांगला प्रतिसाद मिळतोय. आज सकाळपासून व्यापार्‍यांनी आपली दुकानं बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग नोंदवला. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला शिवाजी चौक हा कडकडीत बंद होता तर कापड बाजार गुजरी बाजार जुना मोंढा भागातील ही व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंदच ठेवली.मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

अकोल्यात भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री जात असतांना काही भाजप, नगरसेवकांनी मुख्यमंत्र्याना काळे झेंडे दाखवून पेट्रोल दरवाढीचा निषेध केला. पोलिसांनी भाजपच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.

जळगावात बैलगाडीवरुन रॅली

देशव्यापी बंदला जळगावात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील सर्व प्रमुख मार्गावरुन भाजपने रॅली काढून या बंद मध्ये सहभागी होण्याचं आवाहन लोकांना केलं. बैलगाडीवरुन निघालेल्या या रॅलीचं नेतृत्व विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केलं. व्यापारी संघटनानंीही पाठिंबा दिल्यानं शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठ बंद आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहेय

खेडमध्ये कडकडीत बंद

रत्नागिरी जिल्ह्यात खेड मध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला. खेड मधील बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. तसेच मुंबई - गोवा महामार्गावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा महामार्गावर जोरदार घोषणा बाजी करत टायर जाळून काही वेळ वाहतूक रोखून धरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2012 06:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close