S M L

भारत बंद;सर्वसामान्य वेठीस

31 मेपेट्रोल 'साडेसाती'च्या विरोधात एनडीएने पुकारलेला भारत बंद सर्व पक्षांनासोबत घेऊन संपूर्ण ताकदीनिशी सर्वसामान्याच्या गळ्यात उतरवला आहे. मुंबईसह पुण्यात 95 बसेसची तोडफोड करण्यात आली. तर ठिकठिकाणी रस्ते,महामार्गावर टायर जाळून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला गेला. त्यापाठोपाठ रेल्वे गाड्याही अडवण्यात आल्या. दरवाढीच्या विरोधात पुकारलेल्या संपामुळे मात्र सर्वसामान्य, मध्यमवगीर्ंयाना त्रास सहन करावा लागला. पण ज्याना दोन वेळच्या जेवणांची सोय नसते,त्यांना पेट्रोलशी काही घेणं देणं नसतं अशा गरीब जनतेला आज रात्री उपाशी झोपावे लागले असले यात शंका नाही. पेट्रोलच्या दरात आजपर्यंतच्या इतिहासात 7.50 रुपयांनी विक्रमी वाढ करण्यात आली. इतक्यामोठ्या प्रमाणावर झालेल्या दरवाढीमुळे संतापलेल्या एनडीए सरकारने भारत बंदची हाक दिली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या नागपुरातून बंदला सुरुवात झाली. बुधवारी रात्री भारतीय जनता युवा मार्चाच्या कार्यकर्त्यांनी पाच एसटी बसेसवर दगडफेक करून नारळ फोडला. या बंदला कामगार संघटनांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. तर प्रमुख आणि छोट्यामोठ्या पक्षांनी आपला पाठिंबा दर्शवला. जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या टीमनेही बंदला पाठिंबा दिला. अण्णांनी संपात सहभागी होण्याचे आव्हान केले. पण स्वत: अण्णा आणि टीम कुठेही निदर्शन करताना आढळली नाही. बंदच्या धास्तीमुळे अनेकांनी घराच्या बाहेर न पडण्याचा पवित्रा घेतला. दुसरीकडे रिक्षा,टॅक्सीचालकांनी भीतीपोटी बंद पाळला पण यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. मुंबईत 80 बेस्टच्या बसेसवर दगडफेक करण्यात आली. तर पुण्यात पीएमटीच्या 15बसेस फोडण्यात आल्या आहेत. तसेच देशभरातल्या सर्व मोठ्या शहरांमध्ये दुकानं, टॅक्सी, ऑटो बंद असल्याचं चित्र होते. मुंबई,पुणे नागपूर, कोल्हापूरमध्ये बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्यात तर काही ठिकाणी जबरदस्तीनं दुकानं बंद करायला लावण्यात आली आहे.मुंबईत 80 बेस्ट बसेसवर दगडफेकअविरत धावणार्‍या मुंबईच्या वेगाला भारत बंदमुळे खीळ बसली. लोकांनी बाहेर पडणं टाळल्यानं रस्त्यांवरची गर्दी रोडावली. दुकानं, बाजारपेठा बंद होत्या. बेस्टच्या सुमारे 80 बसेसवर दगडफेक करण्यात आली. टॅक्सी रस्त्यावर न उतरल्यानं प्रवाशांचे हाल झाले. नेहमी गर्दीने भरलेल्या सीएसटी, दादर स्टेशनबाहेर आज शुकशुकाट होता. उपनगरात अनेक ठिकाणी रिक्षाही बंद होत्या. भाजपच्या कार्यकर्त्यांची धरपकडबंदमध्ये शिवसेनेचा जास्त पुढाकार दिसून आला नाही. भाजपचे कार्यकर्ते मात्र आक्रमक होते. मुलुंडमध्ये भाजपनं बैलगाडी मोर्चा काढला तर दहिसरमध्ये रास्ता रोको केलं. भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्यासह 100 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या भागात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करत बसेस रोखल्या, त्यानंतर रस्त्यावरचं भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी ठाण मांडून बसले त्यामुळे काही वेळ या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. मुनंगटीवार यांच्यासोबत आमदार सरदार तारासिंग, राज पुरोहीत आणि किरीट सोमय्या यांंनाही ताब्यात घेतलंय. रामदास आठवले पोलिसांच्या ताब्यातखेरवाडी भागात रिपाई नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केलं. पोलिसांनी रामदास आठवले यांच्यासोबत रिपाई कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. आठवले यांना बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलंय. त्यांच्या अटकेच वृत्त समजताच मुलूंड, चेबुरमध्ये रिपाई कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले आहे.पेट्रोल पंपाची तोडफोडऔरंगाबाद शहरात भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. सेना, भाजप, रिपाई कार्यकर्त्यांनी पैठण गेट, तिलक पथ, गुलमंडी भागात या कार्यकर्त्यांनी पेट्रोल दरवाढी विरोधात तसेच काँग्रेस सरकार विरोधात घोषणा देत दुकान बंद ठेवणाचे आवाहन केले. शहराच्या मुख्य भागांमध्ये बंदला नागरिकरांनी चांगला प्रतिसाद दिला. तसेच क्रांती चौकातील पेट्रोल पंपाची भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. भाजपनं गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं.परभणीत कडकडीत बंदपेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंदला परभणीत चांगला प्रतिसाद मिळतोय. आज सकाळपासून व्यापार्‍यांनी आपली दुकानं बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग नोंदवला. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला शिवाजी चौक हा कडकडीत बंद होता तर कापड बाजार गुजरी बाजार जुना मोंढा भागातील ही व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंदच ठेवली.मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्नअकोल्यात भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री जात असतांना काही भाजप, नगरसेवकांनी मुख्यमंत्र्याना काळे झेंडे दाखवून पेट्रोल दरवाढीचा निषेध केला. पोलिसांनी भाजपच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.नागपुरमध्ये सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळलानागपूरमध्ये अनेक संघटनांनी बंदमध्ये भाग घेतला. रिपब्लिकन आघाडी मोर्चा, ऑटो संघटना, मजदूर संघटना, कम्युनिस्ट पार्टी इत्यादी संघटनांनी नारेबाजी सरकारचा निषेध केला. शिवसेनेनं सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. तर चंद्रपूरमध्ये भाजपनं रॅली काढून जिल्ह्यात बंद 100 टक्के यशस्वी झाल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला.नाशकात रास्ता रोकोनाशिकमध्येही उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. आंदोलन करणार्‍या डाव्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.एकंदरीत भाजप-शिवसेना-आरपीआयनं पेट्रोल दरवाढीविरोधात पुकारलेल्या बंद नेहमी सारखा लोकांनी मुकाट्याने सहन केला.

आईबीएन लोकमत | Updated On: May 31, 2012 02:42 PM IST

भारत बंद;सर्वसामान्य वेठीस

31 मे

पेट्रोल 'साडेसाती'च्या विरोधात एनडीएने पुकारलेला भारत बंद सर्व पक्षांनासोबत घेऊन संपूर्ण ताकदीनिशी सर्वसामान्याच्या गळ्यात उतरवला आहे. मुंबईसह पुण्यात 95 बसेसची तोडफोड करण्यात आली. तर ठिकठिकाणी रस्ते,महामार्गावर टायर जाळून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला गेला. त्यापाठोपाठ रेल्वे गाड्याही अडवण्यात आल्या. दरवाढीच्या विरोधात पुकारलेल्या संपामुळे मात्र सर्वसामान्य, मध्यमवगीर्ंयाना त्रास सहन करावा लागला. पण ज्याना दोन वेळच्या जेवणांची सोय नसते,त्यांना पेट्रोलशी काही घेणं देणं नसतं अशा गरीब जनतेला आज रात्री उपाशी झोपावे लागले असले यात शंका नाही.

पेट्रोलच्या दरात आजपर्यंतच्या इतिहासात 7.50 रुपयांनी विक्रमी वाढ करण्यात आली. इतक्यामोठ्या प्रमाणावर झालेल्या दरवाढीमुळे संतापलेल्या एनडीए सरकारने भारत बंदची हाक दिली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या नागपुरातून बंदला सुरुवात झाली. बुधवारी रात्री भारतीय जनता युवा मार्चाच्या कार्यकर्त्यांनी पाच एसटी बसेसवर दगडफेक करून नारळ फोडला. या बंदला कामगार संघटनांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. तर प्रमुख आणि छोट्यामोठ्या पक्षांनी आपला पाठिंबा दर्शवला.

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या टीमनेही बंदला पाठिंबा दिला. अण्णांनी संपात सहभागी होण्याचे आव्हान केले. पण स्वत: अण्णा आणि टीम कुठेही निदर्शन करताना आढळली नाही. बंदच्या धास्तीमुळे अनेकांनी घराच्या बाहेर न पडण्याचा पवित्रा घेतला. दुसरीकडे रिक्षा,टॅक्सीचालकांनी भीतीपोटी बंद पाळला पण यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. मुंबईत 80 बेस्टच्या बसेसवर दगडफेक करण्यात आली. तर पुण्यात पीएमटीच्या 15बसेस फोडण्यात आल्या आहेत. तसेच देशभरातल्या सर्व मोठ्या शहरांमध्ये दुकानं, टॅक्सी, ऑटो बंद असल्याचं चित्र होते. मुंबई,पुणे नागपूर, कोल्हापूरमध्ये बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्यात तर काही ठिकाणी जबरदस्तीनं दुकानं बंद करायला लावण्यात आली आहे.

मुंबईत 80 बेस्ट बसेसवर दगडफेकअविरत धावणार्‍या मुंबईच्या वेगाला भारत बंदमुळे खीळ बसली. लोकांनी बाहेर पडणं टाळल्यानं रस्त्यांवरची गर्दी रोडावली. दुकानं, बाजारपेठा बंद होत्या. बेस्टच्या सुमारे 80 बसेसवर दगडफेक करण्यात आली. टॅक्सी रस्त्यावर न उतरल्यानं प्रवाशांचे हाल झाले. नेहमी गर्दीने भरलेल्या सीएसटी, दादर स्टेशनबाहेर आज शुकशुकाट होता. उपनगरात अनेक ठिकाणी रिक्षाही बंद होत्या. भाजपच्या कार्यकर्त्यांची धरपकडबंदमध्ये शिवसेनेचा जास्त पुढाकार दिसून आला नाही. भाजपचे कार्यकर्ते मात्र आक्रमक होते. मुलुंडमध्ये भाजपनं बैलगाडी मोर्चा काढला तर दहिसरमध्ये रास्ता रोको केलं. भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्यासह 100 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या भागात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करत बसेस रोखल्या, त्यानंतर रस्त्यावरचं भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी ठाण मांडून बसले त्यामुळे काही वेळ या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. मुनंगटीवार यांच्यासोबत आमदार सरदार तारासिंग, राज पुरोहीत आणि किरीट सोमय्या यांंनाही ताब्यात घेतलंय.

रामदास आठवले पोलिसांच्या ताब्यातखेरवाडी भागात रिपाई नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केलं. पोलिसांनी रामदास आठवले यांच्यासोबत रिपाई कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. आठवले यांना बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलंय. त्यांच्या अटकेच वृत्त समजताच मुलूंड, चेबुरमध्ये रिपाई कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले आहे.

पेट्रोल पंपाची तोडफोड

औरंगाबाद शहरात भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. सेना, भाजप, रिपाई कार्यकर्त्यांनी पैठण गेट, तिलक पथ, गुलमंडी भागात या कार्यकर्त्यांनी पेट्रोल दरवाढी विरोधात तसेच काँग्रेस सरकार विरोधात घोषणा देत दुकान बंद ठेवणाचे आवाहन केले. शहराच्या मुख्य भागांमध्ये बंदला नागरिकरांनी चांगला प्रतिसाद दिला. तसेच क्रांती चौकातील पेट्रोल पंपाची भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. भाजपनं गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं.

परभणीत कडकडीत बंद

पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या भारत बंदला परभणीत चांगला प्रतिसाद मिळतोय. आज सकाळपासून व्यापार्‍यांनी आपली दुकानं बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग नोंदवला. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला शिवाजी चौक हा कडकडीत बंद होता तर कापड बाजार गुजरी बाजार जुना मोंढा भागातील ही व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंदच ठेवली.मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

अकोल्यात भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री जात असतांना काही भाजप, नगरसेवकांनी मुख्यमंत्र्याना काळे झेंडे दाखवून पेट्रोल दरवाढीचा निषेध केला. पोलिसांनी भाजपच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.नागपुरमध्ये सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळला

नागपूरमध्ये अनेक संघटनांनी बंदमध्ये भाग घेतला. रिपब्लिकन आघाडी मोर्चा, ऑटो संघटना, मजदूर संघटना, कम्युनिस्ट पार्टी इत्यादी संघटनांनी नारेबाजी सरकारचा निषेध केला. शिवसेनेनं सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. तर चंद्रपूरमध्ये भाजपनं रॅली काढून जिल्ह्यात बंद 100 टक्के यशस्वी झाल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला.नाशकात रास्ता रोको

नाशिकमध्येही उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. आंदोलन करणार्‍या डाव्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.एकंदरीत भाजप-शिवसेना-आरपीआयनं पेट्रोल दरवाढीविरोधात पुकारलेल्या बंद नेहमी सारखा लोकांनी मुकाट्याने सहन केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2012 02:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close