S M L

'पंतप्रधानांवर आरोप हा कटाचा भाग'

04 जूनकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा ठामपणे बचाव केला आहे. तब्बल एक वर्षांनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनियांनी आक्रमक भूमिका घेतली. नाव न घेता टीम अण्णा आणि विरोधी पक्षांचा त्यांनी समाचार घेतला. पंतप्रधान आणि मंत्र्यांवर केले जाणारे आरोप हा कटाचा भाग आहे. विरोधक आणि काही काँग्रेसविरोधी गट पंतप्रधानांविरोधात खोटे आरोप करत आहेत. अशा आरोपांना आपण आक्रमक उत्तर द्यायला हवं, हे आरोप म्हणजे कटाचा भाग आहे असा आरोप सोनिया गांधींनी केला. त्याचबरोबर आर्थिक समस्यांचा आम आदमीला बसत असलेला फटका हे आपल्यापुढचं आव्हान आहे. केंद्राकडून ठरवल्या जाणार्‍या धोरणांना आणि कार्यक्रमांना काँग्रेसशिवाय इतर पक्षांची सत्ता असलेली राज्यं सहकार्य करत नाहीत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी आपल्याला पक्ष संघटना मजबूत करायला हवी. पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खच्ची करायला नको. संपूर्ण पक्ष सध्या कठीण परिस्थितीतून जातोय, आपल्याला त्याला सामोरं जायला हवं. तसेच पक्षातल्या मतभेदांवरून सदस्यांची कानउघाडणी केली. व्यक्तीपेक्षा पक्ष महत्त्वाचा असल्याचं सोनियांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 4, 2012 10:00 AM IST

'पंतप्रधानांवर आरोप हा कटाचा भाग'

04 जून

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा ठामपणे बचाव केला आहे. तब्बल एक वर्षांनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनियांनी आक्रमक भूमिका घेतली. नाव न घेता टीम अण्णा आणि विरोधी पक्षांचा त्यांनी समाचार घेतला. पंतप्रधान आणि मंत्र्यांवर केले जाणारे आरोप हा कटाचा भाग आहे. विरोधक आणि काही काँग्रेसविरोधी गट पंतप्रधानांविरोधात खोटे आरोप करत आहेत. अशा आरोपांना आपण आक्रमक उत्तर द्यायला हवं, हे आरोप म्हणजे कटाचा भाग आहे असा आरोप सोनिया गांधींनी केला. त्याचबरोबर आर्थिक समस्यांचा आम आदमीला बसत असलेला फटका हे आपल्यापुढचं आव्हान आहे. केंद्राकडून ठरवल्या जाणार्‍या धोरणांना आणि कार्यक्रमांना काँग्रेसशिवाय इतर पक्षांची सत्ता असलेली राज्यं सहकार्य करत नाहीत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी आपल्याला पक्ष संघटना मजबूत करायला हवी. पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खच्ची करायला नको. संपूर्ण पक्ष सध्या कठीण परिस्थितीतून जातोय, आपल्याला त्याला सामोरं जायला हवं. तसेच पक्षातल्या मतभेदांवरून सदस्यांची कानउघाडणी केली. व्यक्तीपेक्षा पक्ष महत्त्वाचा असल्याचं सोनियांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 4, 2012 10:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close