S M L

राज्यात प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर पूर्ण बंदी ?

05 जूनआज जागतिक पर्यावरण दिन साजरा होत आहे आजच्या दिवसाचे औचित्यसाधून राज्य सरकारने महाराष्ट्रवासियांनी अनोखी भेट दिली आहे.राज्यात प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याचा राज्य सरकारचा विचार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात केली. प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे पर्यावरणाची मोठी हानी होतेय. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून लवकरच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या अगोदरही प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालण्यात आली होती. पण मायक्रो पॉलिथिन असणार्‍या पिशव्यांवर बंदी उठवण्यात आली होती. पण खरं चित्र यावरुनही वेगळं आहे. राज्यभरात प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेवर अंमलबजावणी व्हावी अशीच अपेक्षा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 5, 2012 09:55 AM IST

राज्यात प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर पूर्ण बंदी ?

05 जून

आज जागतिक पर्यावरण दिन साजरा होत आहे आजच्या दिवसाचे औचित्यसाधून राज्य सरकारने महाराष्ट्रवासियांनी अनोखी भेट दिली आहे.राज्यात प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याचा राज्य सरकारचा विचार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमात केली. प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे पर्यावरणाची मोठी हानी होतेय. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून लवकरच निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या अगोदरही प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालण्यात आली होती. पण मायक्रो पॉलिथिन असणार्‍या पिशव्यांवर बंदी उठवण्यात आली होती. पण खरं चित्र यावरुनही वेगळं आहे. राज्यभरात प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेवर अंमलबजावणी व्हावी अशीच अपेक्षा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 5, 2012 09:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close