S M L

स्वतंत्रसेनानी जवाहरलाल दर्डा यांची 11 वी पुण्यतिथी

25 नोव्हेंबर , यवतमाळजेष्ठ स्वतंत्रसेनानी जवाहरलाल दर्डा यांची यांची आज 11 वी पुण्यतिथी. या निमित्तानं यवतमाळ इथल्या प्रेरणास्थळ या त्यांच्या समाधीस्थळावर श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या श्रद्धांजली कार्यक्रमात खासदार विजय दर्डा, आमदार राजेंद्र दर्डा, देवेंद्र दर्डा आणि यवतमाळ जिल्ह्यातले मान्यवर उपस्थित होते.पुण्यतिथीच्या निमित्तानं स्वरश्रद्धांजली कार्यक्रमात हरिप्रसाद चौरसीया यांच्या बासरीवादनाचा कार्यक्रम तर अमेरिकन निवासी कोलीना शक्ती यांच्या शास्रीय नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अरुण हळबे यांनी लिहिलेल्या शतकातील यवतमाळ या पुस्तकाचं विमोचनही करण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 25, 2008 10:30 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2008 10:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close