S M L

राष्ट्रध्वजाची शान राखणार्‍या कर्मचार्‍यांचा सत्कार

23 जूनमंत्रालयात गुरुवारी लागलेल्या आगीत जीवाची बाजी लावून सात कर्मचार्‍यांनी तिरंग्याची शान राखली होती. त्यांचा आज भाजपनं सत्कार केला. भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांच्या हस्ते मुंबईत भाजपच्या कार्यालयात हा सत्काराचा कार्यक्रम झाला. या सातही जणांच्या मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची घोषणाही भाजपनं केली आहे. मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यात भीषण अग्नितांडव सुरु असताना सगळे कर्मचारी आपला जीव मुठीत धरून बाहेर पडत होते. पण मंत्रालयाच्या छतावर राष्ट्रध्वज उतरवण्यासाठी या पाच शुरांनी जीवाची बाजी लावून राष्ट्रध्वज उतरवला. राजेंद्र कानडे, गणेश मुंज, पंडित, दिपक अडसुळ, प्रेमजी रोज असे या कर्मचार्‍यांची नाव आहे. हे पाचही कर्मचारी चतृर्थ श्रेणी कर्मचारी आहे. मंत्रालयाच्या आगीवरुन राज्यभरात उडालेल्या संशायाच्या धुराची चर्चा रंगली असताना या पाच शुरविरांचं धाडस पाहुन तमाम महाराष्ट्रयीवासींनी सलाम केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 23, 2012 04:45 PM IST

राष्ट्रध्वजाची शान राखणार्‍या कर्मचार्‍यांचा सत्कार

23 जून

मंत्रालयात गुरुवारी लागलेल्या आगीत जीवाची बाजी लावून सात कर्मचार्‍यांनी तिरंग्याची शान राखली होती. त्यांचा आज भाजपनं सत्कार केला. भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांच्या हस्ते मुंबईत भाजपच्या कार्यालयात हा सत्काराचा कार्यक्रम झाला. या सातही जणांच्या मुलांच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची घोषणाही भाजपनं केली आहे. मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यात भीषण अग्नितांडव सुरु असताना सगळे कर्मचारी आपला जीव मुठीत धरून बाहेर पडत होते. पण मंत्रालयाच्या छतावर राष्ट्रध्वज उतरवण्यासाठी या पाच शुरांनी जीवाची बाजी लावून राष्ट्रध्वज उतरवला. राजेंद्र कानडे, गणेश मुंज, पंडित, दिपक अडसुळ, प्रेमजी रोज असे या कर्मचार्‍यांची नाव आहे. हे पाचही कर्मचारी चतृर्थ श्रेणी कर्मचारी आहे. मंत्रालयाच्या आगीवरुन राज्यभरात उडालेल्या संशायाच्या धुराची चर्चा रंगली असताना या पाच शुरविरांचं धाडस पाहुन तमाम महाराष्ट्रयीवासींनी सलाम केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 23, 2012 04:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close