S M L

आर.आर.पाटलांची मुलगी स्मिताची राजकारणात एंट्री

02 जुलैअसं म्हणतात की, राजकारण आणि समाजकारणाचा वारसा हा नेत्यांच्या मुलांना जन्मापासूनच मिळतो. राज्यातंच नव्हे तर देशातील अनेक प्रख्यात राजकारण्याची पुढची पिढी हि राजकारणातंच सक्रीय झाली आहे.यातंच एक नवीन नाव आता आलंय. आता गृहमंत्री आर आर पाटील यांची मुलगी स्मिता पाटील यांनी राजकारणात प्रवेश केलाय. राष्ट्रवादीच्या युवती काँग्रेसच्या माध्यमातून स्मितानं राजकारणात पाऊल टाकलंय. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उद्या होणार्‍या सांगली दौर्‍यातील युवती मेळावा हा स्मिताच्या राजकारणातील प्रवेशाची नांदीच म्हणावी लागेल. सांगली शहरातील अनेक भागात या कार्यक्रमाचे पोस्टर्स लागले आहे. या पोस्टर्सवरील प्रमुख चेहरा हा स्मितीचा आहे. स्मितानं राजकारणात येताना मंत्र्याची मुलगी म्हणून नाही तर खर्‍या अर्थानं समाजकार्य करुन स्वत:ची ओळख तयार करावी असा सल्ला तीचे वडील आणि राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिला आहे. माझी मुलगी हे तीचं डिमेरीट ठरु नये अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 2, 2012 02:34 PM IST

आर.आर.पाटलांची मुलगी स्मिताची राजकारणात एंट्री

02 जुलै

असं म्हणतात की, राजकारण आणि समाजकारणाचा वारसा हा नेत्यांच्या मुलांना जन्मापासूनच मिळतो. राज्यातंच नव्हे तर देशातील अनेक प्रख्यात राजकारण्याची पुढची पिढी हि राजकारणातंच सक्रीय झाली आहे.यातंच एक नवीन नाव आता आलंय. आता गृहमंत्री आर आर पाटील यांची मुलगी स्मिता पाटील यांनी राजकारणात प्रवेश केलाय. राष्ट्रवादीच्या युवती काँग्रेसच्या माध्यमातून स्मितानं राजकारणात पाऊल टाकलंय. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उद्या होणार्‍या सांगली दौर्‍यातील युवती मेळावा हा स्मिताच्या राजकारणातील प्रवेशाची नांदीच म्हणावी लागेल. सांगली शहरातील अनेक भागात या कार्यक्रमाचे पोस्टर्स लागले आहे. या पोस्टर्सवरील प्रमुख चेहरा हा स्मितीचा आहे. स्मितानं राजकारणात येताना मंत्र्याची मुलगी म्हणून नाही तर खर्‍या अर्थानं समाजकार्य करुन स्वत:ची ओळख तयार करावी असा सल्ला तीचे वडील आणि राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिला आहे. माझी मुलगी हे तीचं डिमेरीट ठरु नये अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2012 02:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close