S M L

प्रणवदा-बाळासाहेबांची 'पॉवर'फूल भेट

13 जुलैशिवसेनेनं राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना जाहीर पाठिंबा देत सर्वांना एकच धक्का दिला. शिवसेनेनं दिलेल्या पाठिंब्यासाठी 'थँक्यू' म्हणण्यासाठी स्वत: प्रणव मुखर्जी आज मातोश्रीवर दाखल झाले आणि बाळासाहेबांची भेट घेतली. 10 ते 15 मिनिट चर्चाही झाली. पण या बैठकीत झालेली चर्चाही सिक्रेट होती असं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले आहे. या बैठकीची सर्व शिष्टाई राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. त्यामुळे गडावर झालेली भेट 'पॉवर'फूल होती अशी चर्चा आता सुरु झालीय. युपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी संध्याकाळी 7 च्या सुमारास मुंबईत दाखल झाले. खास मराठमोळ्या पध्दतीने प्रणवदांचे स्वागत झाले. यावेळी प्रणवदांना घेण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंसह आघाडीचे नेते हजर होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक केंद्रात त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांशी चर्चा केली. हा कार्यक्रम आटोपून प्रणवदांनी मातोश्रीकडे कूच केली. मातोश्रीवर आजवर अनेक मान्यवर येऊन गेलेत पण प्रणवदांची आजची भेट खास होती. शिवसेनाप्रमुखांची भेट झाली,चहापान झाला, चर्चा झाली. बाळासाहेबांनी पत्रकारांशी संवाद सांधला मात्र बैठकीत काय चर्चा झालीही गुलदस्त्याच ठेवली. आमच्यात झालेली चर्चाही सिक्रेट होती त्यामुळे काही सांगता येणार नाही असं बाळासाहेबांनी सांगितलं. पत्रकारांनी बाळासाहेबांना अफजल गुरुची शिक्षा,बेळगावचा प्रश्न, पाठिंबा कोणत्या अटीवर ?अशी अनेक प्रश्न विचारली. प्रणवदा भेट घेऊन तातडीने दिल्लीला रवाना झाले. पण या सगळ्या बैठकीची शिष्टाई शरद पवारांनी केली. एकंदरीच मातोश्रीवर झालेली भेट ही 'खास' होती त्यामुळे येणार्‍या काळात यातून काय चित्र निर्माण होते हे पाहण्याचे ठरेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 13, 2012 04:59 PM IST

प्रणवदा-बाळासाहेबांची 'पॉवर'फूल भेट

13 जुलै

शिवसेनेनं राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना जाहीर पाठिंबा देत सर्वांना एकच धक्का दिला. शिवसेनेनं दिलेल्या पाठिंब्यासाठी 'थँक्यू' म्हणण्यासाठी स्वत: प्रणव मुखर्जी आज मातोश्रीवर दाखल झाले आणि बाळासाहेबांची भेट घेतली. 10 ते 15 मिनिट चर्चाही झाली. पण या बैठकीत झालेली चर्चाही सिक्रेट होती असं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले आहे. या बैठकीची सर्व शिष्टाई राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. त्यामुळे गडावर झालेली भेट 'पॉवर'फूल होती अशी चर्चा आता सुरु झालीय.

युपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी संध्याकाळी 7 च्या सुमारास मुंबईत दाखल झाले. खास मराठमोळ्या पध्दतीने प्रणवदांचे स्वागत झाले. यावेळी प्रणवदांना घेण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंसह आघाडीचे नेते हजर होते. त्यानंतर यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक केंद्रात त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांशी चर्चा केली. हा कार्यक्रम आटोपून प्रणवदांनी मातोश्रीकडे कूच केली.

मातोश्रीवर आजवर अनेक मान्यवर येऊन गेलेत पण प्रणवदांची आजची भेट खास होती. शिवसेनाप्रमुखांची भेट झाली,चहापान झाला, चर्चा झाली. बाळासाहेबांनी पत्रकारांशी संवाद सांधला मात्र बैठकीत काय चर्चा झालीही गुलदस्त्याच ठेवली. आमच्यात झालेली चर्चाही सिक्रेट होती त्यामुळे काही सांगता येणार नाही असं बाळासाहेबांनी सांगितलं. पत्रकारांनी बाळासाहेबांना अफजल गुरुची शिक्षा,बेळगावचा प्रश्न, पाठिंबा कोणत्या अटीवर ?अशी अनेक प्रश्न विचारली. प्रणवदा भेट घेऊन तातडीने दिल्लीला रवाना झाले. पण या सगळ्या बैठकीची शिष्टाई शरद पवारांनी केली. एकंदरीच मातोश्रीवर झालेली भेट ही 'खास' होती त्यामुळे येणार्‍या काळात यातून काय चित्र निर्माण होते हे पाहण्याचे ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 13, 2012 04:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close