S M L

राज ठाकरे घेणार बाळासाहेबांची भेट

16 जुलैराज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहे. उध्दव यांच्या प्रकृतीबद्दल बाळासाहेबांची चर्चा करणार आहे. त्यांनंतर संध्याकाळी पाच वाजता पुन्हा उध्दव यांची भेट घेणार आहे. तसेच लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा करणार आहे.आज सकाळी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांना लिलावतीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. काही वेळापूर्वी त्यांच्यावर अँजिओग्राफीही करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी दिली. सध्या उध्दव यांची प्रकृती चांगली आहे. दरम्यान, अलिबागमधला आपला नियोजित कार्यक्रम सोडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव यांची कुटुंबींयासह भेट घेतली. सहा वर्षापूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेनेला रामराम केल्यानंतर नोव्हेंबर 2008 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तब्येतीची विचारपुस करण्यासाठी मातोश्रीवर भेट घेतली होती. यावेळी उध्दव ठाकरेही हजर होते. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात राज-उध्दव एकत्र यावं अशी इच्छा खुद्द बाळासाहेबांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखती व्यक्त केली होती. बाळासाहेबांच्या या इच्छेला राज यांनी प्रतिसाद दिला होता. मी बाळासाहेबांच्या शिवसेनेत आजही आहे त्यांच्यासाठी मी शंभर पाऊलं पुढे टाकेल असं राज ठाकरे म्हणाले होते. आता हे सगळं घडल्यानंतर आज तब्बल साडेतीनवर्षांनंतर राज ठाकरे बाळासाहेबांची भेट घेणार आहे. संबंधित बातम्या साडेतीन वर्षांनंतर राज-उध्दव भेट(व्हिडिओ) राज ठाकरेंनी घेतली उध्दव ठाकरेंची भेट

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 16, 2012 09:36 AM IST

राज ठाकरे घेणार बाळासाहेबांची भेट

16 जुलैराज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहे. उध्दव यांच्या प्रकृतीबद्दल बाळासाहेबांची चर्चा करणार आहे. त्यांनंतर संध्याकाळी पाच वाजता पुन्हा उध्दव यांची भेट घेणार आहे. तसेच लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा करणार आहे.

आज सकाळी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांना लिलावतीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. काही वेळापूर्वी त्यांच्यावर अँजिओग्राफीही करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी दिली. सध्या उध्दव यांची प्रकृती चांगली आहे. दरम्यान, अलिबागमधला आपला नियोजित कार्यक्रम सोडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव यांची कुटुंबींयासह भेट घेतली.

सहा वर्षापूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेनेला रामराम केल्यानंतर नोव्हेंबर 2008 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तब्येतीची विचारपुस करण्यासाठी मातोश्रीवर भेट घेतली होती. यावेळी उध्दव ठाकरेही हजर होते. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात राज-उध्दव एकत्र यावं अशी इच्छा खुद्द बाळासाहेबांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखती व्यक्त केली होती. बाळासाहेबांच्या या इच्छेला राज यांनी प्रतिसाद दिला होता. मी बाळासाहेबांच्या शिवसेनेत आजही आहे त्यांच्यासाठी मी शंभर पाऊलं पुढे टाकेल असं राज ठाकरे म्हणाले होते. आता हे सगळं घडल्यानंतर आज तब्बल साडेतीनवर्षांनंतर राज ठाकरे बाळासाहेबांची भेट घेणार आहे.

संबंधित बातम्या

साडेतीन वर्षांनंतर राज-उध्दव भेट(व्हिडिओ)

राज ठाकरेंनी घेतली उध्दव ठाकरेंची भेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 16, 2012 09:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close