S M L

शरद पवारांच्या नाराजीचा काँग्रेसला तडाखा

20 जुलैराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्र सरकारला चांगलाच तडाखा दिला. सलग दोन कॅबिनेट बैठकांना गैरहजर राहिल्यानंतर आज त्यांनी मंत्रालयाच्या कामावरही बहिष्कार टाकला. त्यांनी राजीनामा देऊ केल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. यूपीएच्या कार्यपद्धतीवर आपण नाराज असल्याचं पवारांनी सोनिया गांधी आणि पंतप्रधानांना कळवलं. यूपीए सरकारच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला असं फटकारलंय. आज सकाळी प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेत काही वादाचे मुद्दे असल्याचं सांगितलं. पण मंत्रिमंडळात दुसर्‍या क्रमांकासाठी पवार नाराज नाही. आणि काँग्रेसमधल्याच एका गटाचं हे षडयंत्र असल्याचं सांगत कठोर शब्दात टीका केली. त्यानंतर काँग्रेसने पवारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केलेत. पवारांनी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना पत्र लिहिलं.'आमचा पक्ष छोटा आहे. त्याला आदराची वागणूक मिळत नाही. त्यामुळे आम्हाला भविष्यात नीट पक्षबांधणी करायला हवी. म्हणून आम्हाला पक्षासाठी अधिक वेळ देण्याची गरज आहे. आम्ही यूपीएचे सक्षम आणि पुरोगामी मित्र आहोत. आणि आम्ही यूपीएमध्ये यापुढेही कायम राहू.' - शरद पवारपवारांच्या मागण्यामागणी 1 : सरकारी पदांच्या आणि संस्थांच्या नियुक्त्यांचं समान वाटप व्हावंअर्थ :बँका, महामंडळ, राज्यपाल, राज्यसभेचे राष्ट्रपतीनियुक्त खासदार अशा नियुक्त्या मित्रपक्षांना न विचारता होतात - पण घटक पक्षांशी चर्चा व्हावी आणि त्यांच्याही नावांचा विचार व्हावा ---------------------------------------------------------------------मागणी 2 : महत्त्वाचे निर्णय घेताना काँग्रेसनं सर्व मित्रपक्षांना विश्वासात घ्यावंअर्थ : सरकारचा प्रत्येक निर्णय हा सरकारचा आहे केवळ काँग्रेसचा नाही, हे पवारांना दाखवून द्यायचं आहे---------------------------------------------------------------------मागणी 3 : समन्वय समिती स्थापन करावीअर्थ : सरकारचे निर्णय हे सर्व घटक पक्षांना एकत्र घेऊन घेतले जावेत---------------------------------------------------------------------मागणी 4 : किमान समान कार्यक्रमअर्थ : अन्न सुरक्षा विधेयक, रोहयोसारखे महत्त्वाकांक्षी निर्णय काँग्रेसचे कार्यक्रम म्हटले जातात- पण त्यांचं श्रेय सरकारला मिळावं---------------------------------------------------------------------राज्यातही राष्ट्रवादी आक्रमक राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातही आक्रमक भूमिका घेतलीय. राज्यातही आघाडीत समन्वयाचा अभाव असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीच्या आमदारांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत आणि शरद पवारांकडे हे प्रश्न आपण मांडणार आहोत असंही पिचड यांनी सांगितलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 20, 2012 05:37 PM IST

शरद पवारांच्या नाराजीचा काँग्रेसला तडाखा

20 जुलै

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केंद्र सरकारला चांगलाच तडाखा दिला. सलग दोन कॅबिनेट बैठकांना गैरहजर राहिल्यानंतर आज त्यांनी मंत्रालयाच्या कामावरही बहिष्कार टाकला. त्यांनी राजीनामा देऊ केल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. यूपीएच्या कार्यपद्धतीवर आपण नाराज असल्याचं पवारांनी सोनिया गांधी आणि पंतप्रधानांना कळवलं. यूपीए सरकारच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला असं फटकारलंय. आज सकाळी प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेत काही वादाचे मुद्दे असल्याचं सांगितलं. पण मंत्रिमंडळात दुसर्‍या क्रमांकासाठी पवार नाराज नाही. आणि काँग्रेसमधल्याच एका गटाचं हे षडयंत्र असल्याचं सांगत कठोर शब्दात टीका केली. त्यानंतर काँग्रेसने पवारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केलेत.

पवारांनी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना पत्र लिहिलं.

'आमचा पक्ष छोटा आहे. त्याला आदराची वागणूक मिळत नाही. त्यामुळे आम्हाला भविष्यात नीट पक्षबांधणी करायला हवी. म्हणून आम्हाला पक्षासाठी अधिक वेळ देण्याची गरज आहे. आम्ही यूपीएचे सक्षम आणि पुरोगामी मित्र आहोत. आणि आम्ही यूपीएमध्ये यापुढेही कायम राहू.' - शरद पवारपवारांच्या मागण्यामागणी 1 : सरकारी पदांच्या आणि संस्थांच्या नियुक्त्यांचं समान वाटप व्हावंअर्थ :बँका, महामंडळ, राज्यपाल, राज्यसभेचे राष्ट्रपतीनियुक्त खासदार अशा नियुक्त्या मित्रपक्षांना न विचारता होतात - पण घटक पक्षांशी चर्चा व्हावी आणि त्यांच्याही नावांचा विचार व्हावा ---------------------------------------------------------------------मागणी 2 : महत्त्वाचे निर्णय घेताना काँग्रेसनं सर्व मित्रपक्षांना विश्वासात घ्यावंअर्थ : सरकारचा प्रत्येक निर्णय हा सरकारचा आहे केवळ काँग्रेसचा नाही, हे पवारांना दाखवून द्यायचं आहे---------------------------------------------------------------------मागणी 3 : समन्वय समिती स्थापन करावीअर्थ : सरकारचे निर्णय हे सर्व घटक पक्षांना एकत्र घेऊन घेतले जावेत---------------------------------------------------------------------मागणी 4 : किमान समान कार्यक्रमअर्थ : अन्न सुरक्षा विधेयक, रोहयोसारखे महत्त्वाकांक्षी निर्णय काँग्रेसचे कार्यक्रम म्हटले जातात- पण त्यांचं श्रेय सरकारला मिळावं---------------------------------------------------------------------राज्यातही राष्ट्रवादी आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातही आक्रमक भूमिका घेतलीय. राज्यातही आघाडीत समन्वयाचा अभाव असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीच्या आमदारांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत आणि शरद पवारांकडे हे प्रश्न आपण मांडणार आहोत असंही पिचड यांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 20, 2012 05:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close