S M L

विलासरावांच्या अस्थी दर्शनावरुन माणिकरावांवर हायकमांड नाराज

24 ऑगस्टकाँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या अस्थी दर्शनाच्या निमित्तानं काँग्रेसमधीलं वेगळंच राजकारण पुढे आलंय. 28 ऑगस्टला विलासरावांच्या अस्थी या दर्शनासाठी प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवन इथं ठेवल्या जाणार आहेत. तिथंच काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांना त्यांच्या भागातल्या कार्यकर्त्यांना दर्शन घेता यावं यासाठी अस्थिकलश दिले जाणार आहेत. तसेच 30 ऑगस्टला विलासरावांच्या अस्थींचं मलबार हिलमधल्या बाणगंगा तलावात विसर्जन केलं जाणार आहे. अशा कार्यक्रमाची घोषणा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली. पण काँग्रेस हायकमांडला ही बाब आवडलेली नाही. दिल्लीतल्या काँग्रेस श्रेष्ठींनी याबाबत माणिकरावांना जाब विचारल्याचं समजतंय. विलासरावांच्या अस्थी दर्शन कार्यक्रमाच्या निमित्ताने माणिकराव आपली जिल्हाध्यक्षांची मोट बांधत स्वत:चं नेतृत्व पुढे आणत असल्याचा संशय दिल्लीश्वरांना आहे. त्यामुळे आता देशमुख कुटुंबीय प्रदेश काँग्रेसच्या या कार्यक्रमापासून दोन हात लांब राहणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 24, 2012 09:58 AM IST

विलासरावांच्या अस्थी दर्शनावरुन माणिकरावांवर हायकमांड नाराज

24 ऑगस्ट

काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या अस्थी दर्शनाच्या निमित्तानं काँग्रेसमधीलं वेगळंच राजकारण पुढे आलंय. 28 ऑगस्टला विलासरावांच्या अस्थी या दर्शनासाठी प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवन इथं ठेवल्या जाणार आहेत. तिथंच काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांना त्यांच्या भागातल्या कार्यकर्त्यांना दर्शन घेता यावं यासाठी अस्थिकलश दिले जाणार आहेत. तसेच 30 ऑगस्टला विलासरावांच्या अस्थींचं मलबार हिलमधल्या बाणगंगा तलावात विसर्जन केलं जाणार आहे. अशा कार्यक्रमाची घोषणा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली. पण काँग्रेस हायकमांडला ही बाब आवडलेली नाही. दिल्लीतल्या काँग्रेस श्रेष्ठींनी याबाबत माणिकरावांना जाब विचारल्याचं समजतंय. विलासरावांच्या अस्थी दर्शन कार्यक्रमाच्या निमित्ताने माणिकराव आपली जिल्हाध्यक्षांची मोट बांधत स्वत:चं नेतृत्व पुढे आणत असल्याचा संशय दिल्लीश्वरांना आहे. त्यामुळे आता देशमुख कुटुंबीय प्रदेश काँग्रेसच्या या कार्यक्रमापासून दोन हात लांब राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 24, 2012 09:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close