S M L

अखेर कुपोषण प्रश्नी प्रशासनाला आली जाग

20 सप्टेंबरबुलडाणा जिल्ह्यातील कुपोषण प्रश्नी प्रशासनाला अखेर जाग आली आहे. प्रभारी जिल्हाधिकारी बी. के. इंगळे आज भिंगारा गावात पोहोचले. कुपोषणाच्या मुद्यावर त्यांनी गावकरी आणि स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. भिंगार्‍यातलं कुपोषण आयबीएन लोकमतनं उजेडात आणलं होतं. पालकमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी हा दौरा केला. यावेळी त्यांनी कुपोषणग्रस्त मुलांसाठी गावांमध्ये कॅम्प लावणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्यासोबत अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारीही सोबत होते.बुलडाण्यातलं दडवलेलं कुपोषण- तीव्र कुपोषित सॅम कॅटेगरीतील मुलांची संख्या - 209- मॅम- मध्यम कुपोषित मुलं- 666- एनआरएचएमNRHM राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेतून 58.42 कोटीचा निधी मंजूर- हा निधी कुपोषण मुक्तीच्या कार्यक्रमाकरिता विशेष दिला जातो

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 20, 2012 02:57 PM IST

अखेर कुपोषण प्रश्नी प्रशासनाला आली जाग

20 सप्टेंबर

बुलडाणा जिल्ह्यातील कुपोषण प्रश्नी प्रशासनाला अखेर जाग आली आहे. प्रभारी जिल्हाधिकारी बी. के. इंगळे आज भिंगारा गावात पोहोचले. कुपोषणाच्या मुद्यावर त्यांनी गावकरी आणि स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. भिंगार्‍यातलं कुपोषण आयबीएन लोकमतनं उजेडात आणलं होतं. पालकमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी हा दौरा केला. यावेळी त्यांनी कुपोषणग्रस्त मुलांसाठी गावांमध्ये कॅम्प लावणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्यासोबत अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारीही सोबत होते.

बुलडाण्यातलं दडवलेलं कुपोषण

- तीव्र कुपोषित सॅम कॅटेगरीतील मुलांची संख्या - 209- मॅम- मध्यम कुपोषित मुलं- 666- एनआरएचएमNRHM राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेतून 58.42 कोटीचा निधी मंजूर- हा निधी कुपोषण मुक्तीच्या कार्यक्रमाकरिता विशेष दिला जातो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 20, 2012 02:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close