S M L

' ट्रान्सफॉर्मेशन टुवर्ड्स वेलनेस ' चं प्रकाशन

1 डिसेंबर, मुंबईपिया हिंगोरानी फॅट टू फिट अशी ओळख असलेली रविना टंडन आणि गीतकार जावेद अख्तर नुकतेच एका कार्यक्रमात एकत्र आले होते. तो कार्यक्रम होता फिटनेसच्या पुस्तक प्रकाशनाचा. ' ट्रान्सफॉर्मेशन टुवर्ड्स वेलनेस ' हे त्या पुस्तकाचं नाव आहे. अ‍ॅण्टी-ऑबेसिटी डे च्या निमित्ताने या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं होतं. खूप दिवसांपासून कॅमेरा फेस न केल्यामुळेच कदाचित रविना यावेळी लुक्सबाबत तितकीशी कॉन्शियस वाटली नाही. प्रेगन्सीच्या काळात प्रत्येकजणी कॅमेरा आणि मीडियापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. रवीना काही तशी वागली नाही. त्या काळात ती जशी होती तशीच समोर मीडियासमोर आली. ती तिच्या असण्याबद्दल आणि दिसण्याबद्दल निर्धास्त होती. पण मीडियाने तिच्या त्या फॅटी फोटोज्‌ना विनाकारण पब्लिसिटी देऊन काहीबाही लिहिलं होत. पण इतकं असूनही तिच्यासाठी फिल्म ऑफर्स मात्र थांबलेल्या नव्हत्या. " मला सिनेमाची ऑफर आली होती ज्यामध्ये माझा रोल हा प्रेग्नंट लेडीचाच होता. मी स्वत: गरोदर असताना अशा प्रकारची भूमिका करणं मला अशक्य होतं. तरीही मला ऑफर्स ह्या येतच होत्या, " रविना टंडन सांगत होती. अ‍ॅण्टी-ऑबेसिटी डे च्या निमित्ताने रविना टंडन आणि गीतकार जावेद अख्तर यांना त्यांच्या फिटनेसचं रहस्य विचारलं. " माझ्या फिटनेसचं रहस्य हे माझ्या सकस आहारात आहे. जास्त तेलकट खाणं टाळते. त्याऐवजी मी स्टीम केलेले किंवा बेक केलेले पदार्थ खाणं जास्त पसंत करते. जेव्हा मला गोड खायची इच्छा होते तेव्हा साखरेऐवजी आपल्या मार्केटमध्ये सहज उपलब्ध असणारे जिलोटो स्वीट्स खाते, " अशी माहिती रविनाने दिली. " मी हेल्थ कॉन्शियस आहे. आणि माझा काँन्शियसनेस हा प्रॅक्टीकली आहे, " असं जावेद अख्तर म्हणाले. जावेद अख्तर खूप बिझी आहेत. रविनाचं काय चाललंय, असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. तर रविनाला प्रकाश झाच्या 'राजनिती' सिनेमाची ऑफर आली होती. या सिनेमात तिला अजय देवगणच्या आईचा रोल करायचा होता. पण तिने तो नाकारला. अशा प्रकारचे रोल रविना भविष्यात कधीतरी स्वीकारेल अशी आशा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 1, 2008 11:46 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 1, 2008 11:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close