S M L

राजकीय नेतेमंडळी आपापल्या कार्यक्रमात मशगूल

1 डिसेंबर मुंबईअजित मांढरे मुंबईवर 26/11 ला अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्याने अवघा देश शोकाकूल झाला. तर दुसरीकडे राजकीय नेते मात्र ह्या घटनेला विसरून आपल्या नियोजित कार्यक्रमाच्या तयारीला लागले आहेत. गोळ्यांचे आवाज...मृत्यूशी झालेला सामना...ह्या हल्ल्यात जीव गेलेल्यांची चिता अजून थंड झाल्या नाही...अवघा देश ह्या घटनेतून अजूनही सावरला नाही. परंतु देशातील राजकीय मंडळी मात्र ही घटना कधीच विसरले आहेत. याचं ताजं उदाहरण म्हणजे एक सामान्य राजकीय कार्यकर्ता ते लोकसभेचे सभापती झालेले शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक राजकीय संकटे पाहिली, राजकीय दुखवटेही पाहिलेत. परंतु देशावर झालेला सर्वात मोठा 26/11 चा अतिरेकी हल्ला ते विसरले असं वाटतंय. येत्या 2 डिसेंबरला त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईभर बॅनर लावले आहेत तेही श्रद्धांजली देणा-या बॅनरच्या बाजूलाच. इतकंच नव्हेतर वाढदिवसानिमित्त विविध सांस्कृतिक आणि रंगारंग कार्यक्रमांचही आयोजन केलं आहे. आणि विशेष म्हणजे, या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना मनोहर रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे. शिवसेनेनं या कार्यक्रमासाठी मोठी तयारी केली आहे. देशावर दु:खाच सावट असताना राजकीय नेत्यांच्या बेजबाबदारपणाचा आणखी एक नमुना म्हणजे ताजवर झालेल्या हल्ल्याची पाहणी करण्याकरता मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुलांना आणि रामगोपाल वर्मा यांना घटनास्थळी नेलं. एकीकडे राजकीय नेतेमंडळी आपल्या पूर्व नियोजित कार्यक्रमासाठी झटत आहेत. तर दुसरीकडे सामान्य मुंबईकर नागरिक मात्र हल्ल्याच्या घटनेतून अजून सावरलेला नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 1, 2008 01:30 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 1, 2008 01:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close