S M L

'...तर राज्यातला प्रत्येक रस्ता बंद करू'

11 नोव्हेंबरकोल्हापूरमध्ये खासगी आणि सहकारी साखर कारखानदारांची बैठक पार पडली. या बैठकीत उसाची पहिली उचल 2300 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पण हा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं धुडकावून लावला आहे. उसाला 3000 रुपयाचा भाव देण्यातच यावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. जर हा भाव देण्यात आला नाही तरमहाराष्ट्रातला प्रत्येक रस्ता बंद करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला.इंदापूरमध्ये राजू शेट्टी यांची एक सभा पार पडली यावेळी ते बोलत होते. दरम्यान आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नगर-मनमाड हायवेवर राहुरीमध्ये रास्ता रोको केला. सांगलीत बहे-इस्लामपूर रस्त्यावर उसाचे 11 ट्रक्टर अडवून त्यांच्या टायरची हवा सोडली. उसाला तीन हजार रुपये दर मिळाला नाही तर उद्या श्रीरामपूरमध्ये मुख्यमंत्र्याचा कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा शेतकरी संघटनेनं दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 11, 2012 04:05 PM IST

'...तर राज्यातला प्रत्येक रस्ता बंद करू'

11 नोव्हेंबर

कोल्हापूरमध्ये खासगी आणि सहकारी साखर कारखानदारांची बैठक पार पडली. या बैठकीत उसाची पहिली उचल 2300 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पण हा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं धुडकावून लावला आहे. उसाला 3000 रुपयाचा भाव देण्यातच यावा अशी मागणी संघटनेनं केली आहे. जर हा भाव देण्यात आला नाही तरमहाराष्ट्रातला प्रत्येक रस्ता बंद करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला.इंदापूरमध्ये राजू शेट्टी यांची एक सभा पार पडली यावेळी ते बोलत होते. दरम्यान आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नगर-मनमाड हायवेवर राहुरीमध्ये रास्ता रोको केला. सांगलीत बहे-इस्लामपूर रस्त्यावर उसाचे 11 ट्रक्टर अडवून त्यांच्या टायरची हवा सोडली. उसाला तीन हजार रुपये दर मिळाला नाही तर उद्या श्रीरामपूरमध्ये मुख्यमंत्र्याचा कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा शेतकरी संघटनेनं दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 11, 2012 04:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close