S M L

मराठवाडा कृषी विद्यापीठाला वसंतराव नाईक यांचे नाव

24 नोव्हेंबरमराठवाडा कृषी विद्यापीठाला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. वसंतराव नाईक यांचं सध्या जन्मशताब्दीवर्ष सुरू आहे त्यानिमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. वसंतराव नाईक यांचं जन्मस्थान असलेल्या पुसद तालुक्यातल्या गहुली येथे वसंतराव नाईकांचं भव्य स्मारक उभारण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे. तसंच भटक्या आणि विमुक्त जमातीतल्या कार्यकर्त्यांसाठी `वसंतराव नाईक समाज भूषण पुरस्कार` देण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. 1 जुलै 2013 रोजी मुंबईत जन्मशताब्दी कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 24, 2012 09:02 AM IST

मराठवाडा कृषी विद्यापीठाला वसंतराव नाईक यांचे नाव

24 नोव्हेंबर

मराठवाडा कृषी विद्यापीठाला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. वसंतराव नाईक यांचं सध्या जन्मशताब्दीवर्ष सुरू आहे त्यानिमित्त विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. वसंतराव नाईक यांचं जन्मस्थान असलेल्या पुसद तालुक्यातल्या गहुली येथे वसंतराव नाईकांचं भव्य स्मारक उभारण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे. तसंच भटक्या आणि विमुक्त जमातीतल्या कार्यकर्त्यांसाठी `वसंतराव नाईक समाज भूषण पुरस्कार` देण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. 1 जुलै 2013 रोजी मुंबईत जन्मशताब्दी कार्यक्रमाचा समारोप होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 24, 2012 09:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close