S M L

'आम आदमी' आता अधिकृतपणे मैदानात

26 नोव्हेंबरअरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची आज अधिकृत स्थापना करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांची पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून निवड करण्यात आलीय. तर प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांचा पदाधिकार्‍यांमध्ये समावेश आहे. आज संविधान दिन आहे. याच दिवशी केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची स्थापना झालीय. जंतरमंतरवरच्या आजच्या कार्यक्रमाला देशभरातून हजारो लोकांनी उपस्थिती लावली होती. जवळपास दहा हजार लोकांनी संस्थापक सदस्य म्हणून नोंदणी केल्याची माहिती पक्षानं दिली आहे. घराणेशाही आणि भ्रष्टाचार या दोघांनाही पक्षात स्थान नाही, असं यावेळी केजरीवाल यांनी सांगितलं. आता खरी लढाई ही राजकीय नेते आणि आम आदमी दरम्यान असेल असंही केजरीवाल यांनी म्हटलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 26, 2012 10:15 AM IST

'आम आदमी' आता अधिकृतपणे मैदानात

26 नोव्हेंबर

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची आज अधिकृत स्थापना करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांची पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून निवड करण्यात आलीय. तर प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांचा पदाधिकार्‍यांमध्ये समावेश आहे. आज संविधान दिन आहे. याच दिवशी केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची स्थापना झालीय. जंतरमंतरवरच्या आजच्या कार्यक्रमाला देशभरातून हजारो लोकांनी उपस्थिती लावली होती. जवळपास दहा हजार लोकांनी संस्थापक सदस्य म्हणून नोंदणी केल्याची माहिती पक्षानं दिली आहे. घराणेशाही आणि भ्रष्टाचार या दोघांनाही पक्षात स्थान नाही, असं यावेळी केजरीवाल यांनी सांगितलं. आता खरी लढाई ही राजकीय नेते आणि आम आदमी दरम्यान असेल असंही केजरीवाल यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 26, 2012 10:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close