S M L

इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे सुरक्षा तज्ज्ञ भारतात दाखल

3 डिसेंबर, मुंबईइंग्लंड विरुद्धच्या दोन टेस्ट मॅच चेन्नई आणि मोहाली इथं होणार हे आता नक्की झालंय. पण आता प्रतिक्षा आहे ती सुरक्षाविषयक तज्ज्ञांच्या अहवालाची. इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे सुरक्षा तज्ज्ञ रेज डिकासन मंगळवारी रात्री भारतात दाखल झाले. आज दिवसभर ते चेन्नईतल्या एम ए चिदंबरम स्टेडिअमची पाहणी करणार आहेत. तिथून ते रात्री रवाना होतील पंजाबमध्ये मोहालीत. त्यानंतर ते आपला अहवाल इंग्लंड बोर्डाला सादर करतील आणि त्या अहवालावरच इंग्लंडची टीम भारतात येणार किंवा नाही हे ठरेल. डिकासन इंग्लंड टीमबरोबरच भारतात आले होते. पण मुंबईतल्या अतिरेकी हल्ल्यनंतर टीमबरोबर ते ही मायदेशी परतले होते आताच्या दौर्‍यात ते स्टेडिअम बरोबर टीम रहाणार असलेल्या हॉटेलचीही पाहणी करतील आणि टीमच्या सुरक्षा व्यवस्थेविषयी संबंधित भारतीय अधिकार्‍यांशी चर्चा करतील.इंग्लंड क्रिकेट टीम भारतात यावी यासाठी बीसीसीआयचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. पण त्यासाठी इंग्लंड बोर्डाच्या काही सुरक्षा विषयक मागण्या त्यांना पूर्ण कराव्या लागणार आहेत. इंग्लंड बोर्डाची पहिली मागणी आहे, ती वीस कमांडोंचं पथक स्टेडिअममध्ये तैनात करण्याची. त्याचबरोबर मुंबईतल्या अतिरेकी हल्ल्यासारखा प्रसंग दुर्देवाने ओढवलाच तर काय करायचे याचा कृती आराखडा तयार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शिवाय खेळाडूंना मैदानातून थेट विमानाने बाहेर काढण्याची व्यवस्था आहे का ? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. इंग्लंडची टीम दुबईतून थेट चेन्नईला येईल आणि मोहालीतल्या टेस्ट नंतर लगेचच लंडनसाठी रवाना होईल. अर्थात इंग्लंडचे भारतातले राजदूत आणि लंडनमधले भारताचे राजदूत यांच्याशी चर्चा करुनच टीमचा कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 3, 2008 01:56 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 3, 2008 01:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close