S M L

अजित पवारांचे मंत्रिमंडळात पुनरागमन

06 डिसेंबरसिंचन घोटाळ्यावरून झालेल्या आरोपांमुळे अजित पवार यांनी तडकाफडकी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप आला होता. मात्र सव्वा दोन महिने मंत्रिपदापासून दूर राहिलेले अजितदादा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात एंट्री करणार आहे. अजितदादा शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजता राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सत्तेच्या सिंहासनावर पुन्हा विराजमान होणार आहे. याबदल राज्यशिष्टाचार विभागनं दुजोरा दिला आहे. अजित पवारांना राष्ट्रवादीच्या 43 आमदारांचा पाठींबा आहे. समर्थनाचं पत्र प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे दिलंय. पण अधिवेशन संपेपर्यंत अजित पवार कोणत्याही खात्याची जबाबदारी नाही स्वीकारणार नाहीत. आज नवी मुंबईत एका कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमात 'मी पुन्हा मंत्रिमंडळात यावं, असा पक्षातल्या सहकार्‍यांचा आग्रह असल्याचं' सांगून अजित पवारांनी मंत्रिमंडळात परतण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. अजित पवार यांनी 25 सप्टेंबरला तडकाफडकी अर्थखाते आणि उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन एकच धक्का दिला. अजितदादांच्या राजीनाम्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या आमदार,खासदारांनी राजीनामा प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्याकडे सुपूर्द केला. अजित पवारांनी राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तूळात एकच चर्चेला उधाण आलं होतं. काका विरुद्ध पुतण्या असा सामनाच रंगवण्यात आला पण शरद पवार यांनी सर्व शंका,कुशंकांना फुलस्टॉप लावला. शरद पवार यांनी राजीनामा नाट्याच्या तीनदिवसांनतर राष्ट्रवादींच्या मंत्र्यांची बैठक घेऊन सर्व मंत्र्यांकडे डोळे वटारून पाहताच सर्व जण गप्प झाले. आणि अखेरीस अजित पवारांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. अजितदादांच्या राजीनामानाट्यानं राज्याच्या राजकारणाला वेगळं वळणं मिळालं. पण तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजितदादांना परत आणण्यासाठी फिल्डिंग लावली. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पक्षश्रेष्ठींकडे याबद्दल मागणी केली होती. अखेर दुसर्‍या दिवशी श्वेतपत्रिका मंत्रिमंडळात सादर झाली. दोन खंडात सादर करण्यात आलेली श्वेतपत्रिका म्हणजे फक्त एक स्टेटस् रिपोर्ट. यामध्ये फक्त सिंचन क्षेत्र आणि प्रकल्पांची माहिती आणि संपूर्ण पसारा पद्धतशीरपणे मांडण्यात आला. 0.1 टक्क्यांवर झालेला विकास 17 टक्क्यांवर पोहचला. श्वेतपत्रिका म्हणजे अजितदादांना क्लीन चिट अशी घोषणा करून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजितदादांच्या परतीच्या वाट मोकळी करून दिली. मात्र या सव्वा दोन महिन्यात अजितदादांनी मंत्रिपदापासून दूर राहिले. जर श्वेतपत्रिका 'व्हाईट' प्रसिद्ध होणार होती तर अजित पवारांना राजीनामा देण्याचं काय कारण होतं ? अशा प्रश्नांची उत्तर अजितदादांना द्यावी लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 6, 2012 04:42 PM IST

अजित पवारांचे मंत्रिमंडळात पुनरागमन

06 डिसेंबर

सिंचन घोटाळ्यावरून झालेल्या आरोपांमुळे अजित पवार यांनी तडकाफडकी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप आला होता. मात्र सव्वा दोन महिने मंत्रिपदापासून दूर राहिलेले अजितदादा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात एंट्री करणार आहे. अजितदादा शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजता राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सत्तेच्या सिंहासनावर पुन्हा विराजमान होणार आहे. याबदल राज्यशिष्टाचार विभागनं दुजोरा दिला आहे. अजित पवारांना राष्ट्रवादीच्या 43 आमदारांचा पाठींबा आहे. समर्थनाचं पत्र प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे दिलंय. पण अधिवेशन संपेपर्यंत अजित पवार कोणत्याही खात्याची जबाबदारी नाही स्वीकारणार नाहीत. आज नवी मुंबईत एका कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमात 'मी पुन्हा मंत्रिमंडळात यावं, असा पक्षातल्या सहकार्‍यांचा आग्रह असल्याचं' सांगून अजित पवारांनी मंत्रिमंडळात परतण्याचे स्पष्ट संकेत दिले होते.

अजित पवार यांनी 25 सप्टेंबरला तडकाफडकी अर्थखाते आणि उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन एकच धक्का दिला. अजितदादांच्या राजीनाम्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या आमदार,खासदारांनी राजीनामा प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांच्याकडे सुपूर्द केला. अजित पवारांनी राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तूळात एकच चर्चेला उधाण आलं होतं. काका विरुद्ध पुतण्या असा सामनाच रंगवण्यात आला पण शरद पवार यांनी सर्व शंका,कुशंकांना फुलस्टॉप लावला. शरद पवार यांनी राजीनामा नाट्याच्या तीनदिवसांनतर राष्ट्रवादींच्या मंत्र्यांची बैठक घेऊन सर्व मंत्र्यांकडे डोळे वटारून पाहताच सर्व जण गप्प झाले. आणि अखेरीस अजित पवारांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. अजितदादांच्या राजीनामानाट्यानं राज्याच्या राजकारणाला वेगळं वळणं मिळालं. पण तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजितदादांना परत आणण्यासाठी फिल्डिंग लावली. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पक्षश्रेष्ठींकडे याबद्दल मागणी केली होती. अखेर दुसर्‍या दिवशी श्वेतपत्रिका मंत्रिमंडळात सादर झाली. दोन खंडात सादर करण्यात आलेली श्वेतपत्रिका म्हणजे फक्त एक स्टेटस् रिपोर्ट. यामध्ये फक्त सिंचन क्षेत्र आणि प्रकल्पांची माहिती आणि संपूर्ण पसारा पद्धतशीरपणे मांडण्यात आला. 0.1 टक्क्यांवर झालेला विकास 17 टक्क्यांवर पोहचला. श्वेतपत्रिका म्हणजे अजितदादांना क्लीन चिट अशी घोषणा करून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजितदादांच्या परतीच्या वाट मोकळी करून दिली. मात्र या सव्वा दोन महिन्यात अजितदादांनी मंत्रिपदापासून दूर राहिले. जर श्वेतपत्रिका 'व्हाईट' प्रसिद्ध होणार होती तर अजित पवारांना राजीनामा देण्याचं काय कारण होतं ? अशा प्रश्नांची उत्तर अजितदादांना द्यावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2012 04:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close