S M L

टेंभलीला वीजेचा 'आधार' तुटला

21 डिसेंबरनंदुरबार जिल्ह्यातलं टेंभली गाव चर्चेत आलं ते आधार कार्डचं लाँचिंग याच गावात केल्यानंतर..पण आधारच्या लॉंचिंगमुळे प्रकाशात आलेलं टेंभली पुन्हा अंधारात गेलंय. वीजबील थकल्यामुळे या गावाचं वीज कनेक्शन तोडण्यात आलंय. गेल्या वर्षी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातल्या या टेंभली गावात आधारच्या लॉंचिंगचा जंगी कार्यक्रम पार पडला. त्यानिमित्तानं शासकीय यंत्रणेनं रंगरंगोटी करुन टेंभलीचं रुप पालटून टाकलं होतं. त्याचाच एक भाग म्हणजे वीज कनेक्शन नसलेल्या वीजही पुरवण्यात आली. राजीव गांधी मोफत वीज जोडणी योजनेअंतर्गत वीज कनेक्शन देण्यात आलं खरं, पण गरिबीत काहीही फरक न पडल्यानं वीज बिलाची थकबाकी लाखांच्या घरात गेली आणि अखेरीस टेंभली पुन्हा एकदा अंधारात गेलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 21, 2012 10:55 AM IST

टेंभलीला वीजेचा 'आधार' तुटला

21 डिसेंबर

नंदुरबार जिल्ह्यातलं टेंभली गाव चर्चेत आलं ते आधार कार्डचं लाँचिंग याच गावात केल्यानंतर..पण आधारच्या लॉंचिंगमुळे प्रकाशात आलेलं टेंभली पुन्हा अंधारात गेलंय. वीजबील थकल्यामुळे या गावाचं वीज कनेक्शन तोडण्यात आलंय. गेल्या वर्षी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातल्या या टेंभली गावात आधारच्या लॉंचिंगचा जंगी कार्यक्रम पार पडला. त्यानिमित्तानं शासकीय यंत्रणेनं रंगरंगोटी करुन टेंभलीचं रुप पालटून टाकलं होतं. त्याचाच एक भाग म्हणजे वीज कनेक्शन नसलेल्या वीजही पुरवण्यात आली. राजीव गांधी मोफत वीज जोडणी योजनेअंतर्गत वीज कनेक्शन देण्यात आलं खरं, पण गरिबीत काहीही फरक न पडल्यानं वीज बिलाची थकबाकी लाखांच्या घरात गेली आणि अखेरीस टेंभली पुन्हा एकदा अंधारात गेलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2012 10:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close