S M L

'आज रात्री नाही करणार न्यू इयर सेलिब्रेशन'

31 डिसेंबर2012ला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सगळे सज्ज झालेत. पण नाशिकमधल्या विद्यार्थ्यांनी मात्र नव्या वर्षाचं सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय घेतलाय. आम्हाला नव्या वर्षाचं गिफ्ट नको आम्हाला सुरक्षा द्या असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. दिल्लीतील पीडित तरूणीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणतंही सेलिब्रेशन करणार नाही असंही या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तसंच नववर्षाचं फक्त स्वागत करण्यापेक्षा नवीन वर्षाच महिलांचे प्रश्न सोडवण्याचा संकल्प करा असं आवाहन सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केलंय. लष्कर, रेल्वे मंत्रालयाचं 'थर्टीफस्ट' सेलिब्रेशन रद्ददिल्ली सामूहिक बलात्कारप्रकरणातील तरुणीचं निधन झाल्यानंतर संपूर्ण देशावर शोककळा पसरलीय. देशभरात थर्डीफस्टच्या सेलिब्रेशनचाउत्साह कमी झालाय. लष्करानं आपला 31 डिसेंबरचा विशेष कार्यक्रम रद्द केला आहे. तर रेल्वे मंत्रालयानंही आपला आजचा कार्यक्रम रद्दकेले आहे. राजधानी दिल्लीतही पीडित तरूणीला न्याय मिळावा यासाठी आंदोलन करणार्‍या असंख्य तरूणाईने या घटनेमुळे आपलं सेलिब्रेशन रद्द केलंय तर काही जणांनी बुकिंग केल्यामुळे नाईलाजानं यावं लागल्याची प्रतिक्रिया दिली आहे. थर्टीफस्ट साजरा करण्यासाठी पर्यटकांनी कोकणाला पसंती देतात. मात्र यंदाच्या सेलिब्रेशनमध्ये तितकासा उत्साह नाही, असंं इथले हॉटेलमालकही सांगत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2012 10:16 AM IST

'आज रात्री नाही करणार न्यू इयर सेलिब्रेशन'

31 डिसेंबर

2012ला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सगळे सज्ज झालेत. पण नाशिकमधल्या विद्यार्थ्यांनी मात्र नव्या वर्षाचं सेलिब्रेशन न करण्याचा निर्णय घेतलाय. आम्हाला नव्या वर्षाचं गिफ्ट नको आम्हाला सुरक्षा द्या असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. दिल्लीतील पीडित तरूणीला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणतंही सेलिब्रेशन करणार नाही असंही या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तसंच नववर्षाचं फक्त स्वागत करण्यापेक्षा नवीन वर्षाच महिलांचे प्रश्न सोडवण्याचा संकल्प करा असं आवाहन सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केलंय.

लष्कर, रेल्वे मंत्रालयाचं 'थर्टीफस्ट' सेलिब्रेशन रद्ददिल्ली सामूहिक बलात्कारप्रकरणातील तरुणीचं निधन झाल्यानंतर संपूर्ण देशावर शोककळा पसरलीय. देशभरात थर्डीफस्टच्या सेलिब्रेशनचाउत्साह कमी झालाय. लष्करानं आपला 31 डिसेंबरचा विशेष कार्यक्रम रद्द केला आहे. तर रेल्वे मंत्रालयानंही आपला आजचा कार्यक्रम रद्दकेले आहे. राजधानी दिल्लीतही पीडित तरूणीला न्याय मिळावा यासाठी आंदोलन करणार्‍या असंख्य तरूणाईने या घटनेमुळे आपलं सेलिब्रेशन रद्द केलंय तर काही जणांनी बुकिंग केल्यामुळे नाईलाजानं यावं लागल्याची प्रतिक्रिया दिली आहे. थर्टीफस्ट साजरा करण्यासाठी पर्यटकांनी कोकणाला पसंती देतात. मात्र यंदाच्या सेलिब्रेशनमध्ये तितकासा उत्साह नाही, असंं इथले हॉटेलमालकही सांगत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2012 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close