S M L

मुंबईच्या पर्यटनात बॉलीवूडचा समावेश

05 जानेवारीसर्वसामान्यांना बॉलिवूडचं नेहमीच आकर्षण असतं. आता या बॉलीवूडची सफर जगभरातल्या पर्यटकांना करता येणार आहे. कारण एमटीडीसी आता मास्टर प्लॅन ऑफ बॉलीवूड टूरिझम बनवण्याच्या कामी लागलंय. जगभरातल्या पर्यटकांना मुंबईचं सौंदर्य पाहता यावं, यासाठी ही योजना बनवली जातेय. मुंबईतले किल्ले, कान्हेरी सारख्या गुंफा, ब्रिटिशकालीन वास्तू, समुद्रकिनारे तसंच मंदिरं आणि उद्यानं पाहण्याची संधी या सहलीद्वारे उपलब्ध करुन दिली जाणार आहे. हा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आलीय. आणि ही समिती येत्या महिन्याभरात मास्टर प्लॅन MTDC ला देणार आहे. पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2013 11:23 AM IST

मुंबईच्या पर्यटनात बॉलीवूडचा समावेश

05 जानेवारी

सर्वसामान्यांना बॉलिवूडचं नेहमीच आकर्षण असतं. आता या बॉलीवूडची सफर जगभरातल्या पर्यटकांना करता येणार आहे. कारण एमटीडीसी आता मास्टर प्लॅन ऑफ बॉलीवूड टूरिझम बनवण्याच्या कामी लागलंय. जगभरातल्या पर्यटकांना मुंबईचं सौंदर्य पाहता यावं, यासाठी ही योजना बनवली जातेय. मुंबईतले किल्ले, कान्हेरी सारख्या गुंफा, ब्रिटिशकालीन वास्तू, समुद्रकिनारे तसंच मंदिरं आणि उद्यानं पाहण्याची संधी या सहलीद्वारे उपलब्ध करुन दिली जाणार आहे. हा मास्टर प्लॅन तयार करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आलीय. आणि ही समिती येत्या महिन्याभरात मास्टर प्लॅन MTDC ला देणार आहे. पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2013 11:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close