S M L

शिवाजी पार्कच्या परवानगीचा निर्णय आता राज्य सरकारकडे

05 जानेवारीशांतता क्षेत्रात असलेल्या शिवाजी पार्क मैदानावरून आजवर अनेक वाद विवाद झाले. मैदानावर कार्यक्रमासाठी अनेकांनी आग्रह,हट्ट धरला पण न्यायालयाच्या बंधनामुळे अनेक दिग्गजांची हिरमोड झाली पण आता असे होणार नाही असं दिसतंय. कारण न्यायालयाने आता शिवाजी पार्कला 'दावणी'तून मुक्त केलंय आणि 'परवानगी'ची दोर सरकारच्या हातात दिलीय. त्यामुळे पार्कच्या परवानगीसाठी आता राज्य सरकारच्या दरबारात 'हजेरी' लावावी लागणार आहे. 'इस्कॉन'ने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायलयाने हा निर्णय घेतला. या निर्णयानुसार शिवाजी पार्कवर वर्षांतले 30 दिवस खेळांशिवाय इतर कार्यक्रमांसाठी खुलं असणार आहे. पण प्रजासत्ताक दिन, स्वंतात्र्य दिन, 6 डिसेंबर आणि महाराष्ट्र दिन राखीव असणार आहे. उर्वरित 26 दिवस कार्यक्रमासाठी मोकळे करण्यात आले आहे. तसंच कार्यक्रमाच्या परवानगीचे अधिकार संपूर्णपणे राज्य सरकारकडे देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे शिवाजी पार्क हे दादर परिसरातील एकमेव मैदान आहे. या मैदानावर सचिन तेंडुलकर,सुनील गावस्कर, विनोद कांबळी सारखे खेळाडू घडले. या मैदानावर राजकीय सभा, कार्यक्रम होऊ नये यासाठी अनेकवेळा विरोध झाला.अनेक प्रकरण न्यायलयातही गेली. पण आता न्यायालयाने अंग काढल्यामुळे कार्यक्रमांना उधाण येणार यात शंका नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2013 11:49 AM IST

शिवाजी पार्कच्या परवानगीचा निर्णय आता राज्य सरकारकडे

05 जानेवारी

शांतता क्षेत्रात असलेल्या शिवाजी पार्क मैदानावरून आजवर अनेक वाद विवाद झाले. मैदानावर कार्यक्रमासाठी अनेकांनी आग्रह,हट्ट धरला पण न्यायालयाच्या बंधनामुळे अनेक दिग्गजांची हिरमोड झाली पण आता असे होणार नाही असं दिसतंय. कारण न्यायालयाने आता शिवाजी पार्कला 'दावणी'तून मुक्त केलंय आणि 'परवानगी'ची दोर सरकारच्या हातात दिलीय. त्यामुळे पार्कच्या परवानगीसाठी आता राज्य सरकारच्या दरबारात 'हजेरी' लावावी लागणार आहे. 'इस्कॉन'ने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायलयाने हा निर्णय घेतला. या निर्णयानुसार शिवाजी पार्कवर वर्षांतले 30 दिवस खेळांशिवाय इतर कार्यक्रमांसाठी खुलं असणार आहे. पण प्रजासत्ताक दिन, स्वंतात्र्य दिन, 6 डिसेंबर आणि महाराष्ट्र दिन राखीव असणार आहे. उर्वरित 26 दिवस कार्यक्रमासाठी मोकळे करण्यात आले आहे. तसंच कार्यक्रमाच्या परवानगीचे अधिकार संपूर्णपणे राज्य सरकारकडे देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे शिवाजी पार्क हे दादर परिसरातील एकमेव मैदान आहे. या मैदानावर सचिन तेंडुलकर,सुनील गावस्कर, विनोद कांबळी सारखे खेळाडू घडले. या मैदानावर राजकीय सभा, कार्यक्रम होऊ नये यासाठी अनेकवेळा विरोध झाला.अनेक प्रकरण न्यायलयातही गेली. पण आता न्यायालयाने अंग काढल्यामुळे कार्यक्रमांना उधाण येणार यात शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2013 11:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close