S M L

शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या स्मृती उद्यानाचे भूमिपूजन

06 फेब्रुवारीअखेर शिवाजीपार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती उद्यानाचं भूमिपूजन आज करण्यात आले आहे. शिवाजीपार्कवर बाळासाहेब यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी अंत्यसंस्कार झालेल्या जागेवरचा चौथरा हटवताना बाळासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिवाजी पार्कातच बांधकामविरहीत बगीचा बांधू अशी घोषणा शिवसेनेनं केली होती. हे बांधकामविरहीत बगीच्याचं काम 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जंयतीला होणे अपेक्षित होते मात्र 23 जानेवारीपर्यंत त्याची सुरुवातही झाली नव्हती. त्यावेळी महापालिका आयुक्त सिताराम कुंटे यांनी महापौर निवास्थानी झालेल्या कार्यक्रमात हे बगीच्याचे काम तातडीने करू अशी घोषणा केली होती . त्यानुसार आज कोणताही गाजावाजा न करता भूमिपूजन करण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 6, 2013 12:37 PM IST

शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या स्मृती उद्यानाचे भूमिपूजन

06 फेब्रुवारी

अखेर शिवाजीपार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती उद्यानाचं भूमिपूजन आज करण्यात आले आहे. शिवाजीपार्कवर बाळासाहेब यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी अंत्यसंस्कार झालेल्या जागेवरचा चौथरा हटवताना बाळासाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिवाजी पार्कातच बांधकामविरहीत बगीचा बांधू अशी घोषणा शिवसेनेनं केली होती. हे बांधकामविरहीत बगीच्याचं काम 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जंयतीला होणे अपेक्षित होते मात्र 23 जानेवारीपर्यंत त्याची सुरुवातही झाली नव्हती. त्यावेळी महापालिका आयुक्त सिताराम कुंटे यांनी महापौर निवास्थानी झालेल्या कार्यक्रमात हे बगीच्याचे काम तातडीने करू अशी घोषणा केली होती . त्यानुसार आज कोणताही गाजावाजा न करता भूमिपूजन करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 6, 2013 12:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close